Karnataka Election : भाजपचे नेते येदियुरप्पांचा नातू JDS कडून रिंगणात ; बारा उमेदवार बदलले..

JDS Releases its third list : एनआर संतोष यांना गेल्या आठवड्यात भाजपने तिकीट नाकारले होते.
JDS Releases its third list
JDS Releases its third listSarkarnama

karnataka Election 2023 jd s releases its third list of 59 candidates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस,भाजपाने चार उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. त्यानंतर कर्नाटकातील सर्वात जुनी प्रादेशिक पार्टी जेडीएसने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

जेडीएसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी या यादीत ५९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात भाजप आणि काँग्रेसमधून आलेल्यांना जेडीएसने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

यात भाजपमधून आलेले अयानूर मंजूनाथ यांना शिवमोग्गा विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले आहे. तर काँग्रेसचे नेता रघु अचार यांना चित्रदुर्ग विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे.

JDS Releases its third list
Karnataka Election News: प्रचारात कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्याचं इमोशनल कार्ड ; म्हणाले, 'ही माझी..'

भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचे नातू एनआर संतोष यांना अरसीकेरे विधानसभचे तिकीट जेडीएसने दिले आहे. एनआर संतोष यांना गेल्या आठवड्यात भाजपने तिकीट नाकारले होते.

काँग्रेसचे माजी आमदार अनिल लाड यांना बल्लारी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. विविध कारणासाठी जेडीएसने बल्लारी शहर, मांड्या, वरुणा, राजाजीनगरसह बारा विधानसभा मतदार संघात उमेदवार बदलले आहे.

JDS Releases its third list
ED News : काँग्रेसच्या खासदारावर ED ची मोठी कारवाई ; कोट्यवधींची संपत्ती...

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएसने नंजनगुड येथे काँग्रेसचे उमेदवार दर्शन ध्रुवनारायण यांना पाठिंबा देण्याचे ठरवलं आहे.काँग्रेसने दिवंगत ध्रुवनारायण यांच्या मुलालांना निवडणुकीच्या रिंगणात उतवले आहे. बीएस येदियुरप्पा यांचे नातू एनआर संतोष यांनी काही दिवसापूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत एचडी कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

JDS Releases its third list
MVA Politics: 'मविआ' मध्ये पहिली ठिणगी पडली ; राऊत म्हणाले, 'अजितदादाचं का ऐकून घेऊ ? ; मी शरद पवारांचेच ऐकतो, कुणाच्या बापाला..

संतोष हे येदियुरप्पा यांच्या बहीणीचे नातू आहेत. येदियुरप्पाचे निकटवर्तीय म्हणून संतोष यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्यासोबत कामही केले आहे. ते अससीकेरे येथे तीन वर्षापासून समाज कार्यात सक्रिय आहेत.

जेडीएसकडून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक होते. पण भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. संतोष यांच्या समर्थकांनी भाजपच्या विरोधात आंदोलन केलं. आपल्या नातवाचा तिकीट न दिल्याने येदियुरप्पा यांच्या बहीनींने आपल्या भावाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com