Aditi Tatkare: "पालकमंत्रीपद म्हणजे सर्वस्वच नाही तर एक..."; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Aditi Tatkare: महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वाच्या लढाईत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
Aditi Tatkare, Bharat Gogawale
Aditi Tatkare, Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Aditi Tatkare Statement on Raigad Guardian Minister: महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वाच्या लढाईत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. काल एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांची भेटही झाली. दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यानही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा विषय चर्चेला आल्याची माहिती मिळते आहे. यापार्श्वभूमीवर रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा करणाऱ्या मंत्री आदिती तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे. कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

Aditi Tatkare, Bharat Gogawale
Uddhav-Raj Thackeray Alliance : राज ठाकरेंसोबत युतीसाठी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? दिल्लीत पाऊल टाकताच उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

आदिती तटकरे म्हणाल्या, पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य त्यावेळी निर्णय घेतील. रायगड आणि नाशिक जिल्ह्यावर अन्याय होणार नाही आणि निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी महायुतीतील तिन्ही नेते घेतील. काल एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट झाली होती. मोदी आणि अमित शाह यांनी एडीएच्या सर्व घटकपक्षांची बैठक आयोजित केली होती, या बैठकीला ही नेतमंडळी गेली होती. यावेळी भेटीमध्ये रायगडच्या पालकमंत्री संदर्भात कुठली चर्चा झाली असण्याचा संबंध नाही.

Aditi Tatkare, Bharat Gogawale
Top 10 News : शिंदेंच्या मंत्र्याने मांडवली करत स्पॉन्सरशीप मिळवली, 'लवकरच, मी मंत्री होणार!' भाजप आमदाराचा खुलेआम इशारा - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

महायुतीसाठी पालकमंत्रीपद एक मोठी अडचण आहे असं अजिबात नाही. काही अडचणी असल्या तर त्यावर व्यापक चर्चा होणं देखील आवश्यक आहे. वरिष्ठ नेत्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय घेतील. पालकमंत्री पद म्हणजे सर्वस्वच नाही, हा त्यातला एक छोटासा भाग आहे. कारण मी महायुती सरकारमध्येच काम करते आहे, अशा शब्दांत आदिती तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या विधानावरुन तटकरे पालकमंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळं भरत गोगावले यांच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Aditi Tatkare, Bharat Gogawale
Mahavikas Aghadi with MNS : मनसेला महाविकास आघाडीची साथ; निवडणुकीआधी युतीची चर्चा सुरू असतानाच नवा 'पुणे पॅटर्न'

दरम्यान, येत्या १५ ऑगस्टपूर्वीच रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सोडवला जाईल असं नुकतंच मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. तसंच हे पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. तसंच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळायला हवं अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळं शिवसेनेचा आक्रमक पवित्रा आणि वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी यातून यावर लवकरच तोडगा निघेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com