Rahul Gandhi News : काँग्रेसच्या शिबीरात यायला 2 मिनिटे उशीर, पक्षाने राहुल गांधींना दिली शिक्षा; कार्यकर्त्यांसमोरच घडला प्रकार...

Rahul Gandhi’s Late Arrival at Pachmarhi Training Camp : ट्रेनिंग कॅम्पेनचे प्रमुख सचिन राव यांनी उशिरा आलेल्या राहुल गांधी यांना शिक्षेबाबत सांगितले. त्यावर राहुल यांनी काय करावे लागेल, अशी विचारणा केली. राव यांनी किमान 10 पुश अप्स मारावे लागतील, असे उत्तर दिले.
Rahul Gandhi, Congress
Rahul Gandhi Congress Sarkarnama
Published on
Updated on

Congress training camp : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने विविध घटकांतील नागरिकांशी संवाद साधताना दिसतात. पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतही दिलखुलासपणे बोलतानाचे, त्यांच्यासोबत नम्रपणे वावरतानाचे व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. आता पक्षातील कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांना हेवा वाटेल, असा प्रकार रविवारी घडला आहे.

मध्य प्रदेशातील पंचमढी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात राहुल गांधी यांनी मार्गदर्शन केले. पंरतू, तत्पुर्वी राहुल यांनी कार्यक्रमाला येताच सर्व कार्यकर्त्यांसह पदाधिकारी आणि नेत्यांनाही पक्षांतर्गत शिस्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांना येण्यास उशीर झाला. वेळेच्या केवळ दोन मिनिटे उशिरा त्यांचे आगमन झाले. याची शिक्षा म्हणून राहुल यांनी सर्वांसमोरच दहा पुश अप्स मारले. ट्रेनिंग कार्यक्रमांना उशिराने दाखल झाल्यास शिक्षेचा हा नियम तयार करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनीही हा नियम पाळत पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचक संदेश दिला आहे.

Rahul Gandhi, Congress
CJI Gavai video viral : बूटफेक प्रकरणाचा ‘तो’ व्हिडीओ सरन्यायाधीश गवईंनीही पाहिला; आज भर कोर्टात काय म्हणाले?

ट्रेनिंग कॅम्पेनचे प्रमुख सचिन राव यांनी उशिरा आलेल्या राहुल गांधी यांना शिक्षेबाबत सांगितले. त्यावर राहुल यांनी काय करावे लागेल, अशी विचारणा केली. राव यांनी किमान १० पुश अप्स मारावे लागतील, असे उत्तर दिले. त्यावर कोणतेही आढेवेढे न घेत राहुल यांनी शिक्षा भोगली. राहुल यांच्यानंतर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षही विलंबाने दाखल झाले. राहुल यांच्याप्रमाणेच त्यांना शिक्षा म्हणून घाम गाळावा लागला.

Rahul Gandhi, Congress
Maharashtra Government decision : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असा’ निर्णय; फडणवीसांकडून अजितदादा अन् शिंदेंना शह की आणखी काही?

याविषयी मीडियाशी बोलताना काँग्रेस नेते अभिनव बरोलिया यांनी सांगितले की, आमचे नेते राहुलजी यांच्यासाठी हे नवीन नाही किंवा आश्चर्यकारक नाही. आम्ही शिस्तीचे सक्तीने पालन करतो. पक्षामध्ये लोकशाही असून सर्व सदस्य समान आहेत. भाजपप्रमाणे आमच्या पक्षात बॉसिंगची संकल्पना नाही, असे सांगत बरोलिया यांनी राहुल गांधी यांना मिळालेल्या शिक्षेवर भाष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com