DCM Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंच्या आभार दौऱ्यात शिवसेनेचे आमदार मांडणार भाजप विरोधात गार्‍हाणं!

Eknath Shinde, during his visit to Nanded, will file a complaint against BJP. Read more about the political developments in Maharashtra. : आधीच भाजपावर नाराज असलेले एकनाथ शिंदे स्थानिक पातळीवर काय भूमिका घेतात? शिवसैनिकांना कोणता कानमंत्र देतात? हे लवकरच स्पष्ट होईल.
DCM Eknath Shinde-MLA Hemant Patil-Balaji Kalyankar News
DCM Eknath Shinde-MLA Hemant Patil-Balaji Kalyankar NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Nanded News : विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपने युतीधर्म पाळला नाही. मतदारसंघात पैसे वाटून विरोधात काम केले, असा आरोप नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला. तर आमदार हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या स्वबळावर टीका केली. या पार्श्वभूमीवर येत्या 6 फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार दौऱ्याच्या निमित्ताने नांदेडमध्ये येत आहेत.

या दौऱ्यात शिवसेनेचे जिल्ह्यातील आमदार, स्थानिक नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे भाजप विरोधातील गाऱ्हाणं मांडण्याची शक्यता आहे. आमदार बालाजी कल्याणकर, हेमंत पाटील यांनी भाजप विरोधी सूर आळवल्यानंतर त्यांच्याकडून फारशा आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. भाजपने हे प्रकरण संयमाने हाताळण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता महायुतीत तणाव नको, अशी भाजप नेत्यांची भूमिका असल्याचे बोलले जाते.

आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांनी भाजपावर विरोधात काम केल्याचा आणि पैसे वाटल्याचा आरोप मात्र स्थानिक नेत्यांनी खोडून काढला आहे. भाजपाने युतीधर्म पाळला नसता तर नांदेडमधील सर्व जागा महायुतीने जिंकल्या असत्या का? आम्ही प्रामाणिकपणे युतीधर्म पाळला आहे, बालाजी कल्याणकर यांचेही नांदेड उत्तर मतदारसंघात भाजपाने काम केले आहे, असा दावा प्रवीण साले यांनी केला आहे. राज्यात महायुती असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची अशोक चव्हाण यांची भाषा शिवसेनेला पटलेली नाही.

DCM Eknath Shinde-MLA Hemant Patil-Balaji Kalyankar News
MLA Balaji Kalyankar Allegation News : माझ्या विरोधात भाजपने पैसे वाटले; महायुतीत खडखडाट सुरूच!

यातूनच आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर व इतर शिवसेनेची स्थानिक नेते मंडळी भाजपाच्या विरोधात बोलत असल्याची चर्चा देखील या निमित्ताने नांदेडमध्ये होत आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यात भाजप-शिवसेनेतील या तानातानीचे पडसाद उमटतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आधीच भाजपावर नाराज असलेले एकनाथ शिंदे स्थानिक पातळीवर काय भूमिका घेतात? शिवसैनिकांना कोणता कानमंत्र देतात? हे लवकरच स्पष्ट होईल.

DCM Eknath Shinde-MLA Hemant Patil-Balaji Kalyankar News
MLA Hemant Patil On Ashok Chavan : अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे! 'स्वबळा'ने महायुतीत टेन्शन!

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्याच्या पुर्वतयारीसाठी नांदेडमध्ये काल शिवसेनेची बैठक पार पडली. शिवसेनेचे उपनेते व विधानपरिषदेचे गटनेते हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आनंदराव पाटील बोंढारकर, संपर्क प्रमुख दत्तात्रय पईतवार, सहसंपर्क प्रमुख दर्शनसिंह सिद्धू, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, गंगाधर बडूरे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी हजर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com