JP Nadda : नड्डांकडून राहुल गांधींचे आधी कौतुक अन् नंतर टीकेचे बाण; एका विधानाने वादाची ठिणगी

JP Nadda Criticizes Rahul Gandhi : इंदिरा भवनच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणातील काही मुद्यांवर भाजपने टीका केली आहे.
Rahul Gandhi, JP Nadda
Rahul Gandhi, JP NaddaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटनानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी त्याला कारणीभूत ठरले आहे. उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी आपण भाजप, आरएसएस आणि इंडियन स्टेटशी (भारतीय राज्यव्यवस्था) लढत असल्याचे विधान राहुल यांनी केले आहे. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी त्यांचे कौतुक करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते इंडिया भवन या नव्या मुख्यालयाचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी भाजप, आरएसएस आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भारतील संस्थांवर कब्जा केल्याचा आरोप लावला.

Rahul Gandhi, JP Nadda
Rahul Gandhi vs RSS : 'दुसऱ्या कोणत्याही देशात अटक झाली असती', राहुल गांधींचा मोहन भागवतांवर हल्लाबोल

राहुल म्हणाले, असा विचार करून नका की आपण निष्पक्ष लढाई लढत आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की ही लढाई केवळ भाजप किंवा आरएसएससारख्या राजकीय संघटनांविरोधात आहे, तर मग समझून घ्या की, त्यांनी आपल्या देशातील प्रत्येक संस्थेवर कब्जा केला आहे. ता आपली लढाई इंडियन स्टेट (भारतीय राज्यव्यवस्था) च्या व्यवस्थेविरोधात आहे.  

जे. पी. नड्डांकडून पलटवार

जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्या या विधानाचा समाचार घेतला. त्यांनी राहुल गांधी यांचे कौतुकही केले. नड्डा यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे घाणेरडे सत्य आता त्यांच्या नेत्याद्वारेच उघड करण्यात आले. मी राहुल गांधी यांचे कौतुक करतो, कारण त्यांनी देशाला जे माहिती आहे ते स्पष्टपणे सांगितले की, ते भारतीय राज्याशी लढत आहेत.

Rahul Gandhi, JP Nadda
Vinod Tawde News : शरद पवारांची शहांवरील टीका विनोद तावडेंच्या चांगलीच जिव्हारी; म्हणाले, शहांची तडीपारी...

राहुल गांधी आणि त्यांच्या इकोसिस्टीमचा शहरी नक्षलींशी घनिष्ठ संबंध आहेत, हे रहस्य राहिलेले नाही. ते भारताला बदनाम, अपमानित करू इच्छितात. त्यांच्या सातत्यपूर्ण कृतीतून हे दाखवून दिले आहे. त्यांनी जे काही म्हटले आहे ते भारताला तोडण्याच्या आणि आपल्या समाजाला विभादित करण्याच्या दिशेने म्हटले आहे, अशी टीकाही नड्डा यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com