
Navi Delhi News : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संघ प्रमुख मोहन भागवत, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. मोहन भागवत यांनी संविधानावर हल्ला चढवला असून ते दर दोन-तीन दिवसांनी संविधानाचा अपमान करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तर पारदर्शकतेने निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. मात्र आता आयोगाचे निवडणुकीचा डेटा देण्याची जबाबदारी झटकत असल्याचाही दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ते नवी दिल्लीतील काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलत होते.
यावेळी राहुल गांधी भागवत यांच्या राम मंदिर आणि भारताला मिळालेल्या 'खऱ्या स्वातंत्र्या'च्या वक्तव्याचा समाचार घेतला. भागवत यांनी, आपल्या देशाला 'खरे स्वातंत्र्य' हे देशात राम मंदिराची स्थापना झाली तेव्हाच मिळाल्याचे म्हटले होते. यावरून राहुल गांधी यांनी भागवत यांच्या या विधानाला 'देशद्रोही' म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी, देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. पण आज मोहन भागवत ते नाकारत आहेत. त्यांचे असे वक्तव्य हे धाडसी म्हणावे लागेल. जे आपल्या स्वातंत्र्यलढ्यावर हल्ला असल्याचा म्हटले आहे. तर भागवत यांचे वक्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान असून आपल्या संविधानावर हल्ला असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले, मोहन भागवत दर 2-3 दिवसांनी देशाला संदेश देतात. ते स्वातंत्र्य चळवळ आणि संविधानाबद्दल त्यांचे मत मांडतात. अलिकडेच त्यांनी देशद्रोह असणारे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या विधानाप्रमाणे आपल्या संविधानाला कोणतेही स्थान नाही. ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याला कोणतेही महत्त्व नाही. मोहन भागवत म्हणाले होते की अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकाची तारीख 'प्रतिष्ठा द्वादशी' म्हणून साजरी करावी. कारण अनेक शतकांपासून शत्रूंच्या हल्ल्यांना तोंड देणाऱ्या देशाला याच दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले.
आज जे सत्तेत आहेत ते तिरंग्याला वंदन करत नाहीत, राष्ट्रध्वजाचा आदर करत नाहीत, संविधानाचा आदर करत नाहीत आणि भारताबद्दलचे त्यांचे दृष्टिकोन पूर्णपणे वेगळे आहे. त्यांना भारत एका अस्पष्ट, लपलेल्या आणि गुप्त समाजाने चालवावा असे वाटते. त्यांना भारत एका माणसाने चालवावा, असे वाटते आणि त्यांना या देशाचा आवाज दाबायचा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
भागनत यांना हे वक्तव्य करण्यासाठी याच संविधानाने हिंमत दिली आहे. पण हेच वक्तव्य जर त्यांनी दुसऱ्या देशात केले असते तर त्यांना अटक झाली असती. त्यांच्यावर केस चावली गेली असती. ते सतत आपल्याला स्वातंत्र 1947 मिळालेलं नाही असेच म्हणत असतात. आता वेळ आली आहे की यांचे ऐकणं बंद करावे, असेही आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
यावेळी राहुल गांधी यांनी, आपण निष्पक्ष लढाई लढत आहोत, असे समजू नका. ही लढाई भाजप आणि आरएसएसविरुद्धची आहे. यांनी आपल्या देशातील जवळजवळ प्रत्येक संस्था ताब्यात घेतली असून ही लढाई तयार झालेल्या व्यवस्थेविरुद्धची आहे.
राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्र निवडणुकीत काहीतरी चूक झाली आहे. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करत आहे त्याबद्दल आम्हाला अस्वस्थता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात अचानक सुमारे एक कोटी नवीन मतदारांची नोंद होणे चिंताजनक आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची नावे आणि पत्ते असलेली मतदार यादी देणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.
मात्र निवडणूक आयोगाने ही माहिती देण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोग मतदार यादी पारदर्शक करण्यास का नकार देतयं? आम्हाला यादी न देण्यामागे त्यांचा हेतू काय आहे? निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे मात्र ही जबाबदारी आता आयोग झटकत असल्याचा दवा देखील राहुल गांधी यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.