Rahul Gandhi Tweet: राहुल गांधींनी भारत-अमेरिका 'ट्रेड डील'वरून पंतप्रधानांना डिवचलं; म्हणाले,'नरेंद्र मोदी पुन्हा सरेंडर...'

Rahul Gandhi Criticizes PM Modi: अमेरिकेनं लादलेल्या 'टॅरिफ' ने भारतीय राजकारणही मोठ्या प्रमाणात तापवल्याचं दिसून आलं होतं. विरोधकांनी याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकेची झोड उठवली होती. तसेच राहुल गांधींनी टॅरिफच्या मु्द्दा उचलून धरत मोदी सरकारला धारेवर धरले होते. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना डिवचलं आहे.
Rahul Gandhi Narendra Modi Donald Trump  .jpg
Rahul Gandhi Narendra Modi Donald Trump .jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील अनेक देशांवर भरमसाठ टॅरिफ लादला होता. मनमानी कारभाराचं दर्शन घडवताना एखाद्या देशानं जर ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं नाही, तर त्यावर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावण्याचे आदेश त्यांच्याकडून दिले जात होते. मध्यंतरीच्या काळात भारसोबतचे संबंध ताणले गेल्यानंतर अमेरिकेनं भारताविरोधातही कठोर पावले उचलतानाच 50 टक्के टॅरिफ लागू केला होता. पण नंतर काही दिवसांतच भारताला मोठा दिलासा देताना टॅरिफ कमीही केले होते. अशातच अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीला धक्का दिल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं एक ट्विट चर्चेत आलं आहे.

अमेरिकेने लादलेल्या 'टॅरिफ' ने भारतीय राजकारणही मोठ्या प्रमाणात तापवल्याचं दिसून आलं होतं. विरोधकांनी याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकेची झोड उठवली होती. तसेच राहुल गांधींनी टॅरिफच्या मु्द्दा उचलून धरत मोदी सरकारला धारेवर धरले होते. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना डिवचलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर पोस्ट करत पंतप्रधान मोदींना डिवचलं आहे. हे ट्विट त्यांनी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं ट्रम्प यांचं टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्यानंतर केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरेंडर करणार असल्याचं म्हटलं आहे.

संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार करारात देशहिताशी तडजोड झाल्याचा गंभीर आरोपही यावेळी केला आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, "पंतप्रधान यांनी करार करून टाकला. त्यांची फसवणूक आता उघड झाली आहे. ते पुन्हा वाटाघाटी करू शकत नाहीत; केल्या तर पुन्हा शरणागतीच पत्करतील असा दावा करत मोदी सरकारला डिवचलं आहे. गांधी यांनी यापूर्वीही अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवरून मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे तीव्र पडसाद उमटले होते.

Rahul Gandhi Narendra Modi Donald Trump  .jpg
Dhananjay Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे तीन वेळा गावी येऊन गेला! धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा

अमेरिकन कोर्टानं डोनाल्ड ड्रम्प यांना मोठा दणका देतानाच त्यांनी भारतासह इतर देशांवर लादलेला टॅरिफ हा पूर्णत: बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला होता. यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वच देशांवर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला जाहीर केला होता. भारतावरही मोठा टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 50 टक्के टॅरिफ सुरूवातीला लावण्यात आला.

याचा परिणाम भारताच्या अनेक व्यवसायावर झाला. भारतातून अमेरिकेत होणारी निर्णयात जवळपास कमी झाली. अमेरिकेत वस्तूही पाठवणे कठीण झाले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील 50 टक्के टॅरिफ मागे घेऊन 18 टक्के टॅरिफ केला. पण मोठी अट ठेवत म्हटले की, जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी पुन्हा सुरू केली तर आम्ही तुमच्यावर परत 50 टक्के टॅरिफ लावू म्हणजे भारतावर टांगती तलवार कायम होती.

Rahul Gandhi Narendra Modi Donald Trump  .jpg
Badlapur Crime Case: बदलापूर पुन्हा एकदा हादरलं, गोरगरीब महिलांच्या अंडाशयाचीच तस्करी; 3 महिलांना ठोकल्या बेड्या

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याद्वारे विविध देशांवर लावण्यात आलेल्या टॅरिफला रद्दबातल ठरवलं आहे. अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं ट्रम्प यांच्या आर्थिक अजेंड्याच्या एका महत्वपूर्ण मुद्दयाची हार झाल्याचं मानलं जात आहे.

सुप्रीम कोर्टाचा हा निकाल ट्रम्प यांच्याकडून आपत्कालीन शक्तींच्या कायद्यांतर्गत एकतर्फी लावण्यात आलेल्या टॅरिफवर केंद्रीत आहे. अमेरिकन सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की,1977 च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती अधिनियमांतर्गत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षाजवळ सर्व अमेरिकेच्या व्यापारी भागिदारी देशांकडून येणाऱ्या सामानांवर सरसकट आयात शुल्क लावण्याचा अधिकारच नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com