Dhananjay Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे तीन वेळा गावी येऊन गेला! धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा

Krishna Andhale absconding News : सरपंच संतोष देशमुख यांची तेरा महिन्यापुर्वी म्हणजेच डिसेंबर 2025 मध्ये खंडणी प्रकरणातून अपहरण करत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
Santosh Deshmukh- Krishna Andhale News
Santosh Deshmukh- Krishna Andhale NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या संदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. कधी काळी वाल्मिक कराड यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांनी कृष्णा आंधळेचा गेम झाला, तो आता परत कधीच येणार नाही, असा दावा केला होता.

त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मात्र शनिवारी मोठा दावा करत कृष्णा आंधळे हा तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचे माध्यमांना सांगितले. त्यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांची तेरा महिन्यापुर्वी म्हणजेच डिसेंबर 2025 मध्ये खंडणी प्रकरणातून अपहरण करत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, प्रतिक घुले यांच्यासह आठ आरोपींना मोका अंतर्गत अटक करून त्यांच्यावर बीडच्या विशेष न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून (Police) या सर्व आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आज या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. गेल्या वर्षभरापासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे हा तीन वेळा आपल्या गावी येऊन गेला. तो कुटुंबालाही भेटला होता, असा खळबळजनक दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. तो घरी आल्यानंतर कोणा कोणाला भेटला याचा तपास यंत्रणांनी तातडीने केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Santosh Deshmukh- Krishna Andhale News
Solapur BJP : तुमचं नाटक लई झालं. मी बोलताना मध्ये कोणी बोलायचं नाही : भाजप नगरसेविकने सत्ताधाऱ्यांनाच झापले

गेल्या काही दिवसांपासून आरोपींकडून खटला लांबवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. पण आता दोषारोपपत्र दाखल होऊन साक्षीदारांची यादीही कोर्टाला दिली जाणार आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षाही देशमुख यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 मार्च रोजी होणार आहे.

Santosh Deshmukh- Krishna Andhale News
Shivsena VS BJP : शिवसेना नेत्याचा भाजपवर मोठा आरोप; 25 लाख देऊन राष्ट्रवादी नगरसेवकाला फोडले

कोण आहे कृष्णा?

कृष्णा आंधळे संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता. ती तयारी करता करता तो गुन्हेगारीमध्ये आला. यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केले आहेत. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. पत्र्याचे घर आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामध्ये तो आरोपी आहे, तेव्हापासून तो फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्याला फारसे काही घराबद्दल, आई वडिलांबद्दल ओढ नाही. तो अनेक दिवस संपर्कविना राहतो, अशी त्याची पार्श्वभूमी आहे. तो फरार काळात वेगवेगळ्या राज्यात फिरत असल्याची चर्चा आहे.

Santosh Deshmukh- Krishna Andhale News
NCP Merger : विलीनीकरणाचे माहीत नाही म्हणणाऱ्या तटकरेंना तोंडावर पाडले, अमोल कोल्हेंनी दिला सगळ्यात मोठा खुलासा

वाल्मिक जामीनासाठी सुप्रीम कोर्टात..

वाल्मिक कराड याने आपल्याला जामीन मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठ, तसेच मुंबई उच्च न्यायालयात केलेले अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर 26 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

Santosh Deshmukh- Krishna Andhale News
Congress MLAs Tour : नेतृत्व बदलाच्या वादळात २१ आमदार थेट परदेश दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com