Ajit Pawar : कोकणात मतदानाआधीच राष्ट्रवादीने उधळला विजयी गुलाल! पेण नगर पालिकेत अजितदादांचा उमेदवार बिनविरोध

Pen Nagar Parishad Election : कोकणात सध्या सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीने रायगडमध्ये खाते उघडले असून पहिला नगरसेवकही निवडून आला आहे.
Pen Nagar Parishad Election; Ajit Pawar NCP vasudha patil
Pen Nagar Parishad Election; Ajit Pawar NCP vasudha patilsarkarnama
Published on
Updated on

Raigad News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अनेक वर्षांनंतर नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी नेतेही मैदानात उतरले आहेत. एकीकडे महायुतीत मतभेद उफाळून आले असून एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरच बहिष्कार टाकत भाजपच्या ऑपरेशन लोटसवर नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे रायगडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू आहे. येथे मंत्री भरत गोगावले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लक्ष करताना दिसत आहे. अशा तापलेल्या राजकीय वातावरणात मात्र राष्ट्रवादीने जिल्ह्यातील पेण नगर पालिकेत विजयाची तपाका फडकावली आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार येथे बिनविरोध झाल्याने महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे.

रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार संघर्ष सुरू असताना जिल्ह्यात होवून घातलेल्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. पेण नगरपरिषदेच्या 12 प्रभागांसाठी 24 उमेदवार आणि 1 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी ही निवडणूक लागली असून सोमवारी (ता.17) शेवटच्या दिवसापर्यंत महायुती किंवा महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या उमेदवारांची घालमेल सुरू होती.

दरम्यान आता पेण नगर पालिकेत वसुधा पाटील बिनविरोध झाल्या असून रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी सलामी दिली आहे. पेण नगरपालिकेच्या निवडणुकीआधीच राष्ट्रवादीच्या वसुधा पाटील यांनी प्रभाग 9 मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. रामवाडी येथील प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवार वसुधा पाटील यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता.

Pen Nagar Parishad Election; Ajit Pawar NCP vasudha patil
Ajit Pawar NCP : भाजपकडून अजितदादांची पुरती कोंडी? राष्ट्रवादीची फरफट, मित्रपक्षाकडून मिळेना भाव...

परंतु नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाला रामवाडी येथील प्रभाग क्रमांक 9 मधून त्यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नाही. यामुळे वसुधा पाटील या नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

त्यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, यांनी वसुधा पाटील यांचे अभिनंदन केले आहे. वसुधा पाटील यांची नगरसेवक पदाची ही सहावी टर्म आहे. यापूर्वी पाच वेळा याच प्रभागातून त्या मोठ्या फरकाने निवडून आल्या होत्या.

Pen Nagar Parishad Election; Ajit Pawar NCP vasudha patil
Beed मध्ये BJP vs Ajit Pawar गट आमनेसामने, घोषणाबाजीआणि राड्याचा Video Viral

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com