Bharat Jodo Yatra : राहुल गांधी पळाले..; Video व्हायरल

Rahul Gandhi : अचानक सुरु झालेल्या या शर्यतीमुळे या यात्रेत राहुल गांधींनी उत्साह अन् आनंदाची पेरणी केली आहे.
Bharat Jodo Yatra latest news
Bharat Jodo Yatra latest newssarkarnama

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा'(Bharat Jodo Yatra) तेलंगणात पोहचली आहे. आज (रविवारी) यात्रेचा पाचवा दिवस होता. या यात्रेचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे, यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरही पोस्ट केला आहे. (Bharat Jodo Yatra latest news)

Bharat Jodo Yatra सुरु असताना राहुल गांधी यांनी शालेय विद्यार्थी व कार्यकर्त्यांसोबत धावण्याची शर्यत लावली अन् यात्रेत सहभागी असणाऱ्यांना काही कळण्याच्या आत राहुल यांनी शर्यतीला सुरवात केली.त्यांनी अचानक धावण्यास सुरवात केल्यानं यात्रेत सहभागी पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलिस यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. अचानक सुरु झालेल्या या शर्यतीमुळे या यात्रेत राहुल गांधींनी उत्साह अन् आनंदाची पेरणी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांसमोर राहुल गांधी पळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गोलापल्ली (तेलंगणा) येथील यात्रेच्या ५ व्या दिवशी राहुल गांधींच्या यात्रेत काही शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. राहुल गांधी विद्यार्थ्यांना पळण्याची शर्यत लावणार का ? असे विचारले. विद्यार्थ्यांनी होकार देताच ते विद्यार्थ्यांसोबत काही अंतर धावत गेले,असे या व्हिडिओमध्ये दिसते. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी व इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागे धावताना दिसत आहेत.

Bharat Jodo Yatra latest news
Pune News : नियम तोडण्यातही पुणेकरांची 'आघाडी' ; दंड वसुलीसाठी पोलिसांची कसरत

आजच्या यात्रेच्या प्रवासाची काही छायाचित्रेही कॉंग्रेसने शेअर केली आहेत. अन्याय व द्वेषाविरोधात आवाज उठवावाच लागेल. आम्ही भारताला असेच विखरू देणार नाही, असे कॅप्शन काँग्रेसने या फोटोंखाली दिले. राहुल यांनी या यात्रेत आतापर्यंत 1300 किमीहून अधिकचे अंतर पायी कापले आहे.

Bharat Jodo Yatra latest news
Bharat Jodo Yatra : 'रिस्पॉन्स' साठी 'परफॉर्मन्स' चांगला ठेवा ; राहुल गांधींची भाजपनं उडवली खिल्ली

महाराष्ट्रात १४ दिवस पदयात्रा

तेलंगणातून नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश होईल. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात १७ दिवसांचा दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु त्यात आता थोडा बदल करण्यात आला असून राज्यात १४ दिवस पदयात्रा चालेल, असे सांगण्यात आले.

नांदेड येथे सभा

राज्यात ही पदयात्रा प्रामुख्याने मराठवाडय़ातील दोन व विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे. राज्यातील पदयात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे नेते, प्रमुख पदाधिकारी सध्या तयारीला लागले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भारत जोडो पदयात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अ‍ॅड यशोमती ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आदी नेते यात्रेत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांची पहिली जाहीर सभा नांदेड येथे होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com