Bharat Jodo Yatra : 'रिस्पॉन्स' साठी 'परफॉर्मन्स' चांगला ठेवा ; राहुल गांधींची भाजपनं उडवली खिल्ली

Bharat Jodo Yatra : गुजरातला किंवा अन्य राज्यात उद्योग जाणे याच्या पाठीमागे सरकारची कोणतीही भूमिका नाही,"
Bharat Jodo Yatra latest news
Bharat Jodo Yatra latest newssarkarnama
Published on
Updated on

Bharat Jodo Yatra : कॉंग्रेसला लागलेली गळती रोखण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. येत्या नऊ नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. या यात्रेवर भाजपच्या प्रवक्ता शायना एनसी यांनी टीका केली आहे. त्या कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Bharat Jodo Yatra latest news)

"राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाला तोडले आहे, त्यांनी अगोदर आपला पक्ष जोडावा,मग भारत जोडो यात्रा काढावी," असा खोचक सल्ला शायना यांनी राहुल गांधींना दिला आहे. महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात आहे, त्यावर शायना एनसी यांनी भाष्य केलं आहे.

शायना एनसी म्हणाल्या, "महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात आहेत, हा निर्णय सर्वस्वी त्या उद्योगपतींचा असतो. गुजरातला किंवा अन्य राज्यात उद्योग घेणं याच्या पाठीमागे सरकारची कोणतीही भूमिका नाही,"

Bharat Jodo Yatra latest news
Saffron Project : महाराष्ट्रात चाललयं तरी काय ? : आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला !

"राहुल गांधी अथवा काँग्रेसला व्हिजन नाही, त्यांची पार्टी ही सक्षम विरोधी पक्ष आहे का ? की रिजनल पार्टी आहे, याचा त्यांनी विचार करणे गरजेचे आहे. राहुल गांधींचा परफॉर्मन्स चांगला नाही, त्यामुळे त्यांना देशभरात रिस्पॉन्स नाही. तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवा," असा टोमणा शायना एनसी यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

Bharat Jodo Yatra latest news
Eknath Shinde : खान्देशना लोके पक्का दिलदार शेतस, मूठभर लेतस आणि तगारीभर देतस !

"भारतीय चलनी नोटांवर देवतांचे अथवा नेत्यांचे फोटो छापण्यासंदर्भातला सर्वस्वी निर्णय हा संविधानिक स्वरूपात घेतला जातो. त्यामुळे इतर लोक त्याच्यावर राजकारण करत असतील पण या संदर्भातली आपली वैयक्तिक भूमिका कुठलीही नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी नसून ती महाविनाश आघाडी होती आणि त्यांनी काय काम केलं हे कोरोना कालावधीमध्ये दिसून आलेलं आहे. त्यांचे सरकार गेल्यानंतर आता महाराष्ट्र रुळावर येत आहे," असे शायना म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com