Rahul Gandhi: "मेक इन इंडियाच्या नावाखाली 'रिलायन्स ऑन चायना'चा उद्योग सुरु"; आखों देखा हाल म्हणत राहुल गांधींचे गंभीर आरोप

Rahul Gandhi Video on Make in India : 'मेक इन इंडिया' अर्थात 'आत्मनिर्भर भारत' हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. देशांतर्गत रोजगार निर्मितीमध्ये या उपक्रमाचा मोठा वाटा आहे. पण या उपक्रमाची नेमकी काय स्थिती आहे?
Rahul Gandhi on Make in India
Rahul Gandhi on Make in India
Published on
Updated on

Rahul Gandhi Video on Make in India : 'मेक इन इंडिया' अर्थात 'आत्मनिर्भर भारत' हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. देशांतर्गत रोजगार निर्मितीमध्ये या उपक्रमाचा मोठा वाटा आहे. पण या उपक्रमाची नेमकी काय स्थिती आहे, हे संसदेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एका एलईडी टीव्ही बनवणाऱ्या कारखान्याला भेट देऊन त्यांनी 'मेक इन इंडियाच्या नावाखाली रिलायन्स ऑन चायना' हा प्रकार सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या कारखाना भेटीचा व्हिडिओ देखील राहुल गांधी यांनी शेअर केला आहे.

व्हिडिओतून काय सांगितलं?

राहुल गांधी यांनी एका टीव्ही बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिली. यामध्ये नव्या एलईडी टीव्ही बनवण्याची प्रक्रिया कशी असते हे त्यांनी जाणून घेतलं. पण सर्वात महत्वाचं म्हणजे मेक इन इंडियाच्या नावाखाली हे टीव्ही बनवले जात असल्याचं सांगण्यात येत असलं तरी खरी परिस्थिती तशी नाही. कारण भारतात घराघरांमध्ये असणारे बहुतेक कंपन्यांचे टीव्ही ज्याचं उत्पादन भारतात होतं. त्यातील ८० टक्के स्पेअर पार्ट्स हे चीनमधूनच आयात केले जातात. फक्त प्लॅस्टिक कव्हर तेवढं भारतात बनवलं जातं. म्हणजेच मेक इन इंडियाच्या नावाखाली भारतात केवळ टीव्हीची असेम्ब्ली केली जाते, मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. आपल्या प्रत्येकाच्या हातातल्या स्मार्टफोन्सपासून टीव्हीपर्यंत सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे महत्वाचे पार्ट हे चीनमधूनच आयात केले जातात.

Rahul Gandhi on Make in India
Nagpur APMC News: एसआयटी जाहीर होताच कार्यालयाला सील! सचिवाची तडकाफडकी बदली, बाजार समितीत खळबळ

चिनी कंपन्या भारताचा उद्योग बंद करु शकतात

चिनी कंपन्यांनी जर ठरवलं तर ते भारतातील संपूर्ण इलेक्ट्रॉनिक उद्योग ठप्प करु शकतात. यामध्ये भारतातील केवळ टीव्हीच नव्हे तर मोबाईल आणि लॅपटॉप निर्मिती क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. कारण या तिन्ही उद्योगांमध्ये जे डिस्प्ले येतात ते शंभर टक्के चीनमधून येतात. तसंच या उत्पादनांमध्ये जे सेमीकंडक्टर आणि मदरबोर्ड वापरले जातात ते सर्वकाही चीनमधूनच येतात. अॅपल कंपनीची देखील स्वतः सेमिकंडक्टर बनवत नाही. त्यामुळं ते फॉक्सकॉनकडून सेमीकंडक्टर्स घेतात. तमिळनाडूत फॉक्सकॉन आणि टाटा कंपनी जे अॅपलचे मोबाईल बनवणारे कारखाने सुरु करत आहेत ते पण केवळ असेम्बीलच करणार आहेत. त्यामुळं या मेक इन इंडियाला खरंतर असेम्ब्ली इन इंडिया असं म्हटलं पाहिजे असं या कारखान्याची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यानं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

Rahul Gandhi on Make in India
Kolhapur Politics: इचलकरंजीत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अन्याय? चिडलेल्या कार्यकर्त्यांनी फलक ठेवला झाकून

निवडक कॉर्पोरेट्सची एकाधिकारशाही

दरम्यान, छोटे उद्योगपती उत्पादन करु इच्छितात पण त्यांना उत्पादनासाठी देशात योग्य धोरणाची आणि पाठिंब्याची कमतरता आहे. उलट मोठ्या प्रमाणावर कर आणि निवडक कॉर्पोरेट्सचा एकाधिकारच चालत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ज्या निवडक उद्योगांनाच कॉन्ट्रॅक्ट दिले जात असल्यानं त्यांनी देशाचा उद्योग जखडून ठेवला आहे. त्यामुळं जोपर्यंत भारत उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत रोजगार, विकास आणि मेक इन इंडियाच्या गोष्टी केवळ भाषणबाजीच असेल, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. यासाठी ग्राऊंड लेव्हलला बदल होणं अपेक्षित आहे त्यानंतरच भारत असेंब्ली लाईनमधून बाहेर पडून खरोखर उत्पादन क्षेत्रातील एक मोठी पॉवर बनेल आणि चीनला बरोबरीनं टक्कर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com