
Rahul Gandhi Vote Chori Allegations: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेत लोकसभेसह विविध विधानसभांमध्ये मतांची चोरी झाल्याचा पुराव्यानिशी आरोप केला होता. त्यांनी केलेल्या या खळबळजनक आरोपांनंतर निवडणूक आयोगानं त्यांना प्रतिज्ञापत्रावर याबाबी खऱ्या आहेत हे सांगावं, असे निर्देश दिले.
पण आता निवडणूक आयोग खरोखरचं संशयाच्या भोवऱ्यात येतोय की काय अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. कारण राहुल गांधींनी काल केलेल्या आरोपानुसार एकाच वन रुम किचनच्या घरात ८० मतदार असल्याचा दावा केला होता, हा दावा खरा ठरला आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टरनं राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेनंतर त्या घराला भेट दिली. यावेळी पडताळणीत ही खोली एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या नावावर असल्याचं उघड झालं आहे.
बंगळुरुच्या महादेवपूर विधानसभा मतदारसंघातलं हे प्रकरण आहे. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला तब्बल सव्वा लाख मतांचं लीड मिळालं होतं. हा विधानसभा मतदारसंघ बंगळुरु मध्य लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघासह इतर चार मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला काँग्रेसपेक्षा कमी लीड होतं. पण केवळ या एकमेव पाचव्या मतदारसंघात मोठी लीड मिळाल्यानं भाजपचा खासदार निवडून आला होता. त्यामुळं या महादेवपूर मतदारसंघात भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं मतांची चोरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपांनुसार, बंगळूरु शहरातील महादेवपूर विधानसभा मतदारसंघात ज्या ८० मतदारांचा पत्ता एकच दाखवला आहे, त्या मून रेड्डी गार्डन भागातील चाळवजा घराला इंडिया टुडेच्या रिपोर्टरनं भेट दिली. यावेळी त्या घरात राहत असलेल्या डिलिव्हरी बॉय असलेल्या व्यक्तीसोबत त्यानं संवाद साधला. या व्यक्तीला त्यानं काही प्रश्न विचारले. त्यावर आपण एक महिन्यापूर्वीच इथं राहायला आलो असल्याचं त्यानं सांगितलं. तसंच ही खोली कोणाच्या नावावर आहे? असं विचारल्यानंतर जयराम रेड्डी नामकं व्यक्तीचं नाव घेतलं. त्यानंतर हा घरमालक कोण आहे? कुठल्या पक्षाचा आहे? हे रिपोर्टरनं विचारलं तर रहिवाशानं आपल्यलाा हे माहिती नसल्याचं म्हटलं. या चर्चेचा व्हिडिओही चॅनेलनं शूट केलेला आहे. त्यानंतर रिपोर्टनं थेट घरमालक जयराम रेड्डींचा फोनो घेतला. यावेळी या रेड्डी नामकं व्यक्तीनं आपण भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सुरुवातीला मान्य केलं, पण नंतर त्यानं घुमजावं केलं.
पुढे रेड्डी यांनी सांगितलं की, गेल्या दहा वर्षांपासून मी ही खोली भाड्यानं देत आहे. त्यामुळं त्याठिकाणी जे राहिलेत त्यांनी आपलं नाव निवडणूक यादीत नोंदवत असेल पण ते फार काळ इथं राहत नाहीत. काही काळानंतर निघून जातात. त्यावर रिपोर्टनं त्याला विचारलं की, मग याबाबत इथल्या मतदारांबाबत तुम्ही निवडणूक आयोगाला काही माहिती का दिली नाही? कारण तुमच्या खोलीच्या पत्त्यावर ८० मतदारांची नोंदणी झालेली आहे. यावर उत्तर देताना त्यानं सांगितलं की, यातील अनेकजण परत आपल्या गावी गेले आहेत, अनेकजण परत आलेलेच नाहीत. तर काहीजण पुन्हा मतदानासाठी येतात. काहींची मतदानही रद्द झालेलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.