Devendra Fadnavis: पोलीस स्टेशनमधील CCTV अभावी पुण्यातील महिलांना न्याय मिळेना! अन् मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं अत्याधुनिक प्रणालीचं उद्घाटन

Devendra Fadnavis: पुण्यात देशातील सर्वात आधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडलं.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Published on
Updated on

Devendra Fadnavis: पुण्यात देशातील सर्वात आधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचं उद्घाटन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडलं. पण हे उद्घाटन अशा एका घटनेच्या पार्श्वभूमीवर पार पडलं जिथं काही दिवसांपूर्वीच कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये तीन दलित महिलांना पोलिसांनी कथित मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही नसल्यांन या प्रकरणाची उद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सीसीटीव्ही उद्घाटनाच्या कार्यक्रमात केलेली भाषणबाजी केवळ भाषणवाजीच ठरली आहे.

Devendra Fadnavis
Tamil Nadu SEP : तामिळनाडू सरकारनं जाहीर केलं 'द्विभाषा' शैक्षणिक धोरण! NEPला थेट आव्हान; 'या' कमिटीनं दिला हिरवा कंदील

मुख्यंमत्री भाषणात काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले, १० वर्षांपूर्वी ऑगस्ट २०१५ मध्ये पुण्यात सार्वजनिक ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या पहिल्या फेजला सुरूवात झाली. त्यानंतर त्यात आपण काही ना काही प्रमाणात आपण भर घालत गेलो. पण पुण्याला अतिशय विस्तारीत आणि आधुनिक सीसीटिव्ही प्रणालीची गरज होती, तसंच त्याची कमांड आणि कन्ट्रोल करायला मिळणं गरजेचं होतं. आज मला अतिशय आनंद होत आहे की, पुण्याला अशा प्रकारची कदाचित देशातील सर्वात आधुनिक असी सीसीटीव्ही प्रणाली आणि त्याच्या कमांड आणि कन्ट्रोल सिस्टिमचं आपण पुणे शहरात उद्घाटन केलं आहे.

Devendra Fadnavis
Rahul Gandhi Vote Chori : राहुल गांधी करायला गेले एक अन्, आयोगाच्या हाती कोलीतही दिलं!

कॅमेरॅची वैशिष्ट्ये

या सिस्टिमची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात अत्याधुनिक कॅमेरे आहेत, ३६० डिग्री कॅप्चर करु शकतील असे कॅमेरे आहेत, नाईट व्हिजनचे कॅमेरे आहेत, एएनपीआरचे कॅमेरे आहेत, त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचे विषय असतील, गुन्हेगारांचं ट्रॅकिंग असेल, वाहतूक नियमांचं उल्लंघन असेल, एखादा कार्यक्रम मॉनिटरिंग करायचं असेल अशा सगळ्या गोष्टी या माध्यमातून करता येतील. तसंच याला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची जोडही देण्यात आली आहे. त्यामुळं हे केवळ सीसीटीव्ही इमेजेस कॅप्चर करणारे नाहीत तर त्या फोटोंचं, परिस्थितीचं, गुन्ह्याच्या घटनेचं अॅनॅलिसिस देखील करणारे आहेत.

Devendra Fadnavis
Kapil Raj Joins Reliance : दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणारा ईडीचा अधिकारी रिलायन्समध्ये करतोय नोकरी!

सर्व घाटांत सीसीटीव्ही बसवणार

तसंच एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करुन त्या ठिकाणाहून पसार झाला तर त्याला शोधण्याकरता काही मिनिटांमध्ये हजारो कॅमेरे आहेत त्याचं विश्लेषण करुन त्याला पकडता येईल अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे. म्हणजे एक जुनं गाणं होतं, 'बचके रहना रे बाबा तुझपे नजर है" तशा प्रकारची व्यवस्था आता पुण्यात पोलीस विभागानं केलेली आहे. पुण्यात बोपदेव घाटात जी घटना घडली त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की पुण्यात असे अनेक ब्लॅकस्पॉट आहेत जिथं लोक फिरायला जातात.

नयनरम्य वातावरण असल्यामुळं लोक तिथं पिकनिकला जातात, पण ते सगळे स्पॉट निर्जन ठिकाणी आहेत. मग अशा ठिकाणी गुन्हे घडत असतात त्यामुळं त्याचं पोलिसिंग करणं सोपं नाही. त्यामुळं असे सर्व ब्लॅक स्पॉट टेक्नॉलॉजकल देखरेखीखाली आणा असे आपण आदेश दिले होते. त्यातील पहिलं बोपदेव घाटाचं काम झालेलं आहे. त्यानंतर आता सर्व घाट आणि टेकड्या जिथं निर्मनुष्य अशी व्यवस्था आहे त्या ठिकाणी पुढच्या दोन महिन्यात हे सर्व नेटवर्क कार्यान्वित होईल. तसंच कुठलीही घटना तिथं घडू नये अशा प्रकारची व्यवस्था देखील करता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com