Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या 'वोटचोरी' कॅम्पेनला मोठा धक्का; काँग्रेसनं भावनेच्या भरात केलेली गंभीर चूक आली समोर

Congress Vote Chori Campaign : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप आणि निवडणूक आयोगानं एकमेकांशी संगनमत करुन महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतांची चोरी केल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
Rahul Gandhi vote Chori Campaign
Rahul Gandhi vote Chori CampaignSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप व निवडणूक आयोगावर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये मतचोरी केल्याचा गंभीर आरोप केला.

  2. काँग्रेसच्या या मोहिमेत वापरण्यात आलेल्या व्हिडिओतून अभिनेता के.के. मेनन यांनी आपली परवानगी न घेता त्यांचा क्लिप वापरल्याचा आरोप केला.

  3. के.के. मेनन यांनी स्पष्ट केलं की ते काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनाचा भाग नाहीत आणि क्लिपचा वापर परवानगीशिवाय करण्यात आला आहे.

Mumbai News : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप आणि निवडणूक आयोगानं एकमेकांशी संगनमत करुन महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतांची चोरी केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यानंतर इंडिया आघाडीच्या वतीनं दिल्लीत मोठं आंदोलनही करण्यात आलं. पण एकीकडे राहुल गांधींनी विरोधकांची मोट बांधत सुरू केलेलं आणि जबरदस्त फॉर्मात असलेल्या मतचोरीच्या कॅम्पेनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस पक्षानं भावनेच्या भरात मोठी चूक केल्याचं एका अभिनेत्यानं म्हटलं आहे.

दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेता के. के. मेनन यानं काँग्रेस पक्षावर धक्कादायक आरोप केला आहे. त्यानं मंगळवारी (ता.12) याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये मेनन याने काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवर आक्षेप घेतला आहे.

अभिनेता के. के. मेनन याने ‘स्पेशल ऑप्स’ या वेब सीरिजमध्ये हिंमत सिंगची भूमिका साकारली होती. याच वेबसीरिजमध्ये तो ‘वोट चोरी’(Vote Chori Campaign) मोहिमेचा प्रचार करताना दिसून आला होता. पण याच व्हिडीओवरुन त्यानं काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे. त्यानं आपण काँग्रेसच्या कुठल्याही आंदोलनाचा भाग नसल्याचाही खुलासा केला आहे.

Rahul Gandhi vote Chori Campaign
Congress News: महाराष्ट्रात काँग्रेसला धक्क्यावर धक्के; बड्या नेत्यानं 'आऊटगोईंग' रोखण्यासाठी काढला 'हा' पर्याय

के. के. मेनननं काँग्रेसनं त्यांच्या मतचोरीच्या कॅम्पेनसाठी आपल्या वापरण्यात आलेल्या व्हिडीओ क्लिपवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यानं काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेली व्हिडीओ क्लिप माझ्या परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

के. के. मेनन यानं ‘प्लिज, लक्षात घ्या की, मी या जाहिरातीत काम केलेलं नाही. माझ्या स्पेशल ऑप्स या वेबसीरिजची एक प्रमोशनल क्लिप एडिट करण्यात आली आहे. या व्हिडीओतून हिंमत सिंगच्या वक्तव्याचा संदर्भ देत लोकांना मतचोरीच्या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मात्र, आता के. के. मेनननं काँग्रेसच्या मतचोरीच्या मोहिमेलाच मोठा धक्का दिला आहे. यात त्यानं काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही मोहिमेत सहभाग घेतला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यापूर्वी काँग्रेसनं त्याची कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचा दावा अभिनेता के.के.मेनन यानं केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे .

kay kay menon
kay kay menonkay kay menon

काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून वोट चोरीविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून विविध व्यासपीठांवरून ते महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये वोट चोरी झाल्याचा आरोप भारतीय निवडणूक आयोगावर करत आहेत. मतदारयाद्यांमधील घोळाचे पुरावे देत त्यांनी नुकतीच आयोगाच्या कारभाराची चिरफाड केली.

Rahul Gandhi vote Chori Campaign
Sanjay Gaikwad Controversy: 'माझी कॉपी करणं उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही' म्हणणाऱ्या संजय गायकवाडांची 24 तासांतच पलटी; आता म्हणतात...

आता राहुल गांधी त्यांनी नवी मोहिम हाती घेतली आहे. त्यांनी ‘वोट चोरी’विरोधात एक नवी वेबसाईटस सुरू केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून मोहिम सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी देशवासियांना केले आहे. त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत मोहिमेला समर्थन मागितले आहे. एक एक मोबाईल क्रमांकही जारी करण्यात आला आहे.

प्र.१: राहुल गांधींनी कोणावर मतचोरीचा आरोप केला?
उ.१: राहुल गांधींनी भाजप आणि निवडणूक आयोगावर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप केला.

प्र.२: अभिनेता के.के. मेनन यांनी काय आरोप केला?
उ.२: त्यांनी काँग्रेसवर त्यांच्या परवानगीशिवाय व्हिडिओ क्लिप वापरल्याचा आरोप केला.

प्र.३: ही क्लिप कुठून घेतली होती?
उ.३: ही क्लिप ‘स्पेशल ऑप्स’ वेब सीरिजमधील त्यांच्या भूमिकेवर आधारित होती.

प्र.४: के.के. मेनन काँग्रेसच्या मोहिमेत सहभागी होते का?
उ.४: नाही, त्यांनी स्पष्ट केलं की ते काँग्रेसच्या कोणत्याही मोहिमेत सहभागी नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com