Congress News: 'मतचोरी'वरुन राजकारण तापवणाऱ्या राहुल गांधींना त्यांच्याच राजकीय गुरुंनी आणलं अडचणीत; भारतीयांच्या भावना दुखावणारं विधान

Rahul Gandhi Vote Chori : एकीकडे राहुल गांधींनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे त्यांचे निकटवर्तीय आणि ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी काँग्रेसला अडचणीत आणणारं वक्तव्य केलं आहे.
Sam Pitroda, Rahul Gandhi
Sam Pitroda, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

ठळक मुद्दे :

  1. राहुल गांधींचा आरोप: राहुल गांधींनी मतचोरीवरून केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आणि भाजपविरोधातील लढाई तीव्र केली.

  2. सॅम पित्रोदांचे वादग्रस्त विधान: पाकिस्तान व बांगलादेशमध्ये घरासारखं वाटतं, असं वक्तव्य करून पित्रोदांनी काँग्रेसला अडचणीत आणलं.

  3. Gen Z ला आवाहन: राहुल गांधींनी तरुण, विद्यार्थी आणि Gen Z यांना संविधान वाचवून लोकशाहीचे रक्षण करण्याचे आवाहन केले.

New Delhi News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मतचोरीवरुन केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भाजपविरोधातील लढाई आणखी तीव्र केली आहे. एकीकडे राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मतचोरीच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे त्यांचे निकटवर्तीय आणि ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी काँग्रेसला अडचणीत आणणारं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेसचे नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या एका विधानामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. पित्रोदा हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेसला अडचणीत आणत असतात. आता एकीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध ताणले गेले आहेत.याचदरम्यान, सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं, असं विधान केलं आहे.

पित्रोदा म्हणाले, शेजारच्या देशांवर आपल्या परराष्ट्र धोरणाचं लक्ष असायला हवं. या देशांसोबतचे संबंध आपण सुधारू शकतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याचवेळी त्यांनी आपण पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्येही राहिलो आहे. पण तुम्हाला सांगतो, तिथे मला आपल्या घरात असल्यासारखं वाटतं. या देशांमध्ये गेल्यावर मला कधीही परदेशात असल्यासारखं वाटत नसल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

Sam Pitroda, Rahul Gandhi
Fadnavis on Padalkar : जयंत पाटलांसंदर्भातील विधानानंतर फडणवीसांचा पडळकरांना सल्ला; ‘चांगला नेता म्हणून भविष्यात तुम्हाला मोठी संधी;पण...’

काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी Gen Z, तरुण, आणि विद्यार्थ्यांना संविधान वाचवण्याचं आवाहन केलं. त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर एक पोस्ट शेअर केली. त्यात या देशातील तरुण, विद्यार्थी आणि Gen Z संविधान वाचवतील, लोकशाहीचं रक्षण करतील आणि मतांची चोरी रोखतील,असं म्हटलं आहे.

राहुल गांधींच्या या आवाहनावरही सॅम पित्रोदा यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मी Gen-Z ने राहुल गांधी यांच्यासोबत उभं राहावं. त्यांच्या आवाजात आपलाही आवाज मिळवावा, असे मी त्यांना सांगू इच्छित असल्याचं त्यांनी सांगितलं.

Sam Pitroda, Rahul Gandhi
Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर हा भाजपने माजवलेला नेता, तोच भाजपचा घात करील?

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी एका पॉडकास्ट दरम्यान केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता. जिथे त्यांनी देशाच्या विविध भागांतील भारतीयांच्या शारीरिक स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी चिनी, आफ्रिकन, अरब आणि गोरे अशा वांशिक आणि वांशिक ओळखींचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने "वर्णद्वेषी" म्हणत राजकीय वातावरण चांगलंच तापवलं होतं.

Q1: राहुल गांधींनी कोणावर गंभीर आरोप केले?
👉 केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले.

Q2: सॅम पित्रोदांच्या वक्तव्यामुळे काय वाद निर्माण झाला?
👉 त्यांनी पाकिस्तान व बांगलादेशमध्ये घरासारखं वाटतं असं विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला.

Q3: राहुल गांधींनी कोणाला संविधान वाचवण्याचं आवाहन केलं?
👉 देशातील तरुण, विद्यार्थी आणि Gen Z यांना.

Q4: सॅम पित्रोदांनी यापूर्वी कोणत्या वक्तव्यामुळे अडचणीत आले होते?
👉 भारतीयांच्या शारीरिक स्वरूपावर वांशिक तुलना करून केलेल्या विधानामुळे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com