Rahul Gandhi : राहुल गांधी 'वायनाड' सोडून पारंपारिक 'रायबरेली'लाच देणार पसंती?

Wayanad and Raebareli Constituency : ...त्यामुळे राहुल गांधींनाही 17 जून आधीच याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करावा लागणार आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama

Rahul Gandhi and Loksabha Election Result News : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि केरळमधील वायनाड मतदारसंघातून यंदा लोकसभा निडणूक जिंकली आहे. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राहुल गांधी नेमकं कोणत्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आणि कोणता मतदारसंघ सोडणार? यावरून विविध अंदाजही वर्तवले जात होते.

अखेर काँग्रेस वर्किंग कमेटीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आणि राहुल गांधी तीन ते चार दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. मात्र राहुल गांधी वायनाडला सोडून रायबरेली मतदारसंघाचेच प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नियमानुसार एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. परंतु तो केवळ एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकतो. त्याला निवडणूक निकालाच्या 14 दिवसांच्या आत त्याने निवडणूक लढवलेल्या दुसऱ्या मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे राहुल गांधींनाही 17 जून आधीच याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण, 18 व्या लोकसभेचे पहिले सत्र 15 जूनच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi
Uttar Pradesh Lok Sabha Election : …तर 'यूपी'तील दोन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक! ही आहेत कारणं

शनिवारी झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधींनी कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे या मुद्य्यांवरून काँग्रेस नेत्यांमध्ये काहीसे मतभेद झाल्याचीही चर्चा आहे. प्राप्त माहितीनुसार, केरळच्या कोडिक्कुन्निल सुरेश सारख्या खासदारांनी राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ कायम ठेवावा असा आग्रह धरला.

तर रायबरेली मतदारसंघासाठी सुद्धा अनेकांनी जोर दिला. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्या आराधना मिश्रा यांनी म्हटले की, रायबरेली हा गांधी परिवाराचा पारंपारिक मतदारसघं आहे, जो पिढ्यांपिढ्या चालत आलेला आहे आणि राहुल गांधींनी तो वारसा कायम राखला पाहिजे.

Rahul Gandhi
Narendra Modi Vs Rahul Gandhi : आता सामना आमने-सामने; काँग्रेसचं ठरलं, राहुल गांधीच मोदींना भिडणार...

काहींनी असेही म्हटले की राहुल गांधींनी(Rahul Gandhi) रायबरेली मतदारसंघावरील आपला ताबा कायम ठेवनं, उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या राजकीय उद्धारासाठी अतिशय आवश्यक आहे. या ठिकाणी लोकसभेच्या एकूण 80 जागा आहे.

राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. वायनाडमधून त्यांनी सलग दुसरा विजय मिळवला आहे. तर रायबरेलीमध्ये सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्याने राहुल यांना उमेदवारी देण्यात आली होती. तिथेही त्यांनी साडे तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

मागील निवडणुकीत राहुल यांचा अमेठीमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे रायबरेलीतील विजयाबाबत धाकधूक होती. पण येथील मतदारांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबासोबतच असल्याचे दाखवून दिले.

अमेठी पराभव होत असताना वायनाडने राहुल यांना साथ दिली होती. मागीलवेळी ते चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. तर यावेळीही त्यांच्या विजयाचे अंतर तब्बल 3 लाख 90 हजार एवढे आहे. हा मतदारसंघ 2009 पासून काँग्रेसच्या मागे उभा राहिला आहे. त्यामुळे रायबरेली आणि वायनाड हे दोन्ही मतदारसंघ राहुल यांच्यासाठी महत्वाचे आहे

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com