आर्यनला जामीन मिळाला अन् मुकुल रोहतगी म्हणाले...

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांना उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला.
Mukul Rohatgi
Mukul Rohatgi Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा (Mummun Dhamecha) आणि अरबाझ मर्चंट (Arbaaz Merchant) या तिघांना उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. यानंतर आर्यनच्या वतीने बाजू मांडणारे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे.

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात आहे. आर्यनसह तिघांच्या जामिनावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे.

Mukul Rohatgi
जामीन मिळाला तरी आर्यनचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्येच

मुकुल रोहतगी म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाने तीन दिवसांच्या युक्तिवादानंतर तिघांनी जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा उच्च न्यायालयाचा सविस्तर आदेश उद्या मिळणार आहे. ते तिघे उद्या किंवा शनिवारी कारागृहातून सुटतील.

यानंतर निकालावर रोहतगी यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, माझ्यासाठी हे नेहमीचे आहे. काही वेळा मी जिंकतो आणि काही वेळा हरतो. आर्यनला जामीन मिळाला याचा मला आनंद आहे.

Mukul Rohatgi
किशोर यांची भविष्यवाणी अन् भाजपवाले म्हणाले, अमित शहांनी आधीच सांगितलं होतं!

उच्च न्यायालयात सलग तीन दिवस आर्यनसह तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर तिघांची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्यन आणि अरबाझ हे आर्थर रोड कारागृहात तर मुनमुन भायखळा महिला कारागृहात आहे. जामिनाचा आदेश आज उच्च न्यायालयाकडून मिळालेला नाही. उद्या हा आदेश मिळणार असून, त्यानंतर त्यांची सुटका होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com