Rajasthan Bypolls Election VIDEO : उमेदवाराने थेट निवडणूक अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली; कारण आले समोर...

Candidate assaults election officer: राजस्थानमध्ये बुधवारी सात विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे,
Naresh Meena
Naresh MeenaSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Bypolls News : मतदान केंद्रावरच एका अपक्ष उमेदवाराने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. ईव्हीएम मशिनवर निवडणूक चिन्ह ठळक नसल्याने संतापलेल्या उमेदवाराने आपला राग अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे काढल्याची घटना घडली.

राजस्थानमध्ये सात विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदान सुरू आहे. देवळी-उनियाला मतदारसंघातही मतदान सुरू आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर नरेश मीणा हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. मतदारसंघातील एका मतदान केंद्रांवर त्यांना आपला संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

Naresh Meena
Sharad Pawar Vs Ajit Pawar : वेगळा पक्ष म्हणून ओळख निर्माण करा! सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांना निर्देश

ईव्हीएम मशीनवर आपले निवडणूक चिन्ह ठळक नसल्याने ते निवडणूक आयोगावर संतापले होते. मतदान प्रक्रिया सुरू असताना एका मतदान केंद्रावर पाहणीसाठी निवडणूक अधिकारी व उपविभागीय अधिकारी अमित चौधरी आले होते. यावेळी मीणा यांनी नौसार गावांतील मतदानावरून तक्रार केली, त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

प्रशासनाच्या विरोधात मीना यांनी मतदान केंद्राबाहेरच आंदोलन सुरू केले. त्यानंतर त्यांनी तिथे आलेल्या अमित चौधरी यांच्या कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकही अवाक झाले. पोलिसांनी तातडीने यामध्ये हस्तक्षेप करत मीणा यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर राजस्थानातील सरकारी अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Naresh Meena
Supreme Court : अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; सरकारला ठणकावले

दरम्यान, मीणा हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर बंडखोरीच्या कारणामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. या मतदारसंघात काँग्रेसने कस्तूरचंद मीणा यांना उमेदवारी दिली आहे. नरेश मीणा यांच्या उमेदवारीमुळे त्यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देवळी उनियाला मतदारसंघासह राज्यात खींवसर, चौरासी, संलूबर, दौसा आणि रामगढ मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे 40 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंगात एकूण 69 उमेदवार रिंगणात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com