Jaipur : राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बंडखोरांना 'थंड' करण्यात भाजपला यश आले असले तरी काँग्रेसला एका जागेवर बंडखोरीचा सामना करावा लागतो आहे. या सातपैकी पाच जागांवर तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
दोन जागांवर थेट भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. त्रिकोणी लढत असलेल्या पाच जागांपैकी दोन जागांवर बीएपी, एका जागेवर आरएलपी आणि दोन जागांवर अपक्ष उमेदवार भाजप-काँग्रेसला कडवी झुंज देत आहेत. भाजपसह काँग्रेससाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर पक्षाने कस्तूरचंद मीणा यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपने माजी आमदार राजेंद्र गुर्जर यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र काँग्रेसचे बंडखोर नरेश मीणा यांनी देखील आपला अर्ज दाखल केला असून, यामुळे काँग्रेसला येथे आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
ही जागा मागील निवडणुकीत आरएलपीकडे होती. आता भाजपने रेवतराम डागा यांना पुन्हा उमेदवारी देत मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने रतन चौधरी, तर आरएलपीने कनिका बेनीवाल यांना नवा चेहरा म्हणून निवडले आहे. येथे भाजपने एका राजपूत नेत्याला आपल्याकडे वळवले असल्याने आरएलपीसमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.
काँग्रेसची परंपरागत मानली जाणारी ही जागा ओला कुटुंबाकडेच राहिली आहे. यावेळी काँग्रेसने अमित ओला यांच्यावर विश्वास दाखवला आहे. भाजपने माजी बंडखोर नेते राजेंद्र भांबू यांना उमेदवारी दिली असून, माजी मंत्री राजेंद्र गुडा यांच्या पत्नी निशा कंवर यांनी देखील अर्ज भरला आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे भाजप -काँग्रेस या दोन्ही पक्षांना त्यांच्या मतांमध्ये फूट पडण्याची भीती आहे.
तीन वेळा भाजपच्या खात्यात गेलेल्या या जागेवर पक्षाने सहानुभूती कार्ड खेळत माजी आमदार अमृतलाल मीणा यांच्या पत्नी शांता मीणा यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने पंचायत समिती प्रमुख रेशमा यांना संधी दिली असून, बीएपीच्या जितेश कुमार कटारा यांच्या उमेदवारीमुळे येथेही तिरंगी लढत दिसून येते आहे.
ही जागा बीएपीच्या ताब्यात होती आणि पुन्हा एकदा बीएपीने ती राखण्यासाठी जोर लावला आहे. येथे भाजप आणि काँग्रेस दोघांनीही नवे चेहरे उतरवले आहेत. मागील दोन निवडणुकांत हे दोन्ही पक्ष येथे अपयशी ठरले होते, त्यामुळे यावेळी ही लढत रंगदार होणार आहे.
दौसा आणि रामगड या दोन जागांवर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट सामना रंगणार आहे. रामगड येथे भाजपने आपल्या बंडखोराला शांत करण्यात यश मिळवलं आहे, त्यामुळे या जागांवर काँटे की टक्कर पाहायला मिळेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.