PM Narendra Modi : एक देश एक निवडणूक, UCC..! पंतप्रधान मोदींनी सांगितला आपला अजेंडा

One Nation One Election Rashtriya Ekta Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियातून सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarbana
Published on
Updated on

New Delhi News : दिवाळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळीच सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असून पंतप्रधान मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना मोदींनी एक देश एक निवडणूक, समान नागरी संहिता या मुद्द्यांवरही महत्वाचे भाष्य केले आहे.

देशभरात आज एकता दिवसही साजरा केला जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला एकतेचा संदेश दिला. ते म्हणाले, आता आपण एक देश एक निवडणुकीवर काम करत आहोत. त्यामुळे देशाची लोकशाही मजबूत होईल. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी गती मिळेल.

PM Narendra Modi
Ravi Raja : मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

एक राष्ट्र एक नागरी संहिता म्हणजेच धर्मनिरपेक्ष नागरीक संहितेच्या दिशेने आपण जात आहोत. यासाठी सामाजिक एकदा ही आमची प्रेरणा आहे. आमच्या प्रत्येक योजनेत, प्रत्येक धोरणात आणि आमच्या भावनेत एकतेची शक्ती आहे, असेही मोदी म्हणाले आहेत.

मागील 70 वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपूर्ण देशात लागू होऊ शकले नाही. त्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 एक मोठी अडचण होती. आता हे कलम कायमचे गाडले गेले आहे. पहिल्यांदाच येथील मुख्यमंत्र्यांनी आपल्या संविधानानुसार शपथ घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले.

PM Narendra Modi
Mahayuti News : जंगल नया है, शेर वही है ; फडणवीसांचे 16 शिलेदार अजितदादा-शिंदेंकडून मैदानात

जम्मू-काश्मीरमधील लोकांना फुटीरतावाद आणि दहशतवादाचा अजेंडा मोडित काढला आहे. येथील जनतेने भारतीय लोकशाहीला विजयी केले आहे. मी आज राष्ट्रीय एकदा दिवसानिमित्त मी या लोकांना सलाम करतो, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथे पंतप्रधान मोदींनी सरदार पटेलांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी सरदार पटेल यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, अशी भावना व्यक्त केली. देशाच्या एकतेचे रक्षण करणे, हीच त्यांच्या जीवनातील सर्वोच्च प्राथमिकता होती, असेही मोदी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com