Rajasthan Politics : राजस्थानातील बस्ती मतदारसंघात माजी आयएएस-आयपीएस अधिकारी आमने-सामने; नातेवाइकात चुरशीची लढत

Rajasthan Assembly Election : राजस्थान विधानसभेची निवडणूक या वेळेस विविध कारणांमुळे रंगतदार ठरत आहे.
Laxman Meena, Chandra Mohan Meena News
Laxman Meena, Chandra Mohan Meena NewsSarkarnama
Published on
Updated on

Rajsthan Election : राजस्थान विधानसभेची निवडणूक या वेळेस विविध कारणांमुळे रंगतदार ठरत आहे. या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पहिले जात असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी पती-पत्नी, तर काही ठिकाणी नातेवाईक रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे राजस्थानातील बस्ती विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी माजी आयएएस आणि आयपीएस उमेदवार आमने-सामने रिंगणात उतरले आहेत.

विशेष म्हणजे दोघेही जवळचे नातेवाईक असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. बस्ती विधानसभा मतदारसंघाचा पूर्व इतिहास पहिला, तर 2018 आणि 2013 मध्ये अपक्ष उमेदवार अंजू धनका येथून विजयी झाल्या होत्या, तर 2018 मध्ये लक्ष्मण मीना यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती अन् ते विजयी झाले होते. त्यापूर्वी 1993 ते 2003 मध्ये भाजपचे कन्हैया लाल विजयी झाले होते. या वेळेसच्या निवडणूक रिंगणात उतरलेले दोन्ही उमेदवार माजी आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत.

Laxman Meena, Chandra Mohan Meena News
Mahua Moitra Case : 'एथिक्स कमिटी'च्या बैठकीत गोंधळ; मोईत्रांसह विरोधी पक्षाच्या खासदारांचे समितीवर गंभीर आरोप

काँग्रेसने (Congress) या मतदारसंघातून आयपीएस लक्ष्मण मीना यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपने (BJP) निवृत्त आयएएस चंद्र मोहन मीना यांना रिंगणात उतरविले आहे. चंद्र मोहन मीना आणि लक्ष्मण मीना हे दोघेही जवळचे नातेवाईक आहेत. त्यासोबतच दोघांची गावे जवळच आहेत व दोघेही एकत्र शाळेत गेले होते.

चंद्रमोहन मीना यांच्यापेक्षा लक्ष्मण मीना वयाने थोडे मोठे आहेत. लक्ष्मण हे डुंगा भागातील सिया का बस गावचे रहिवासी आहेत, तर चंद्र मोहन हे जयराम का बस या गावातील आहेत. लक्ष्मण मीणा यांनी 2009 मध्ये व्हीआरएस घेऊन राजकारणात प्रवेश केला. तर चंद्र मोहन हे 1980 च्या बॅचचे अधिकारी आहेत आणि लक्ष्मण 1982 च्या बॅचचे अधिकारी आहेत. चंद्र मोहन हे 1988 ते 1990 पर्यंत जालोरमध्ये जिल्हाधिकारी होते, तर त्याच काळी लक्ष्मण मीना हे पोलिस (Police) अधीक्षक होते.

बस्ती विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख 33 हजार 74 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 21 हजार 481 पुरुष मतदार आहेत, तर 1 लाख 11 हजार 293 महिला मतदार आहेत. या वेळेसच्या निवडणुकीत 15 हजार 648 नवे मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. त्याशिवाय या मतदारसंघात मीना समाजाचे 50 हजारपेक्षा अधिक मतदार आहेत. त्यामुळेच बस्ती विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या माजी आयएएस आणि आयपीएस या दोन नातेवाइकांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Laxman Meena, Chandra Mohan Meena News
Mohammad Faisal News : राष्ट्रवादीचे खासदार फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल; पवार गटाला मोठा दिलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com