Mohammad Faisal Revokes Disqualification : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानंतर लोकसभा सचिवालयाने फैजल यांचे सदस्यत्व बहाल केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार आहेत. केरळ हायकोर्टाने 2009 च्या हत्येचा प्रयत्न प्रकरणात फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. ज्यामुळे त्यांना या वर्षी 4 ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले होते.
फैजल यांच्या संदर्भात लोकसभा अध्यक्षांनी नोटिफिकेशन काढले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवार गटातील लोकसभेतील खासदारांची संख्या पुन्हा 4 वर गेली आहे. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा लोकसभा सचिवालयाने त्यांना खासदारकी बहाल केली आहे.
फैजल यांची खासदारकी 5 वर्षांत दोन वेळा सचिवालयाकडून बहाल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्हा संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असतानाच शरद पवार गटाला धक्का बसला होता. फैजल यांना दुसऱ्यांदा खासदारकी गमवावी लागली होती. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाचे 3 खासदार राहिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर फैजल यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे लोकसभेमध्ये 4 खासदार होते. तर अजित पवार यांच्या गटाकडे फक्त सुनील तटकरे हे एकटेच खासदार आहेत. निवडणूक आयोगाच्या लढाईमध्ये खासदारांची संख्या महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.