Rajsthan News : काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट हे राजस्थानातील टोंक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली असून मंगळवारी त्यांनी टोंक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सचिन पायलट यांनी पत्नी सारा पायलट यांच्यापासून घटस्फोट घेतला असल्याचे पुढे आले आहे. त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात घटस्फोटीत असा उल्लेख केला आहे. सचिन पायलट यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन मुले त्यांच्यावर अवलंबून असल्याचा उल्लेख केला आहे.
सचिन पायलट यांच्या पत्नी सारा पायलट या जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांच्या कन्या आहेत. त्यांचा विवाह २००४ मध्ये झाला होता. त्यानंतर सुमारे १९ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला असल्याचे पुढे आले आहे. (National Politics) विशेष म्हणजे यामध्ये घटस्फोट कधी झाला आहे, याचा नेमका उल्लेख करण्यात आलेला नाही. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांच्या त्या भगिनी आहेत. त्यांना अरन व विहान अशी दोन मुले आहेत.
सचिन आणि सारांचे जानेवारी २००४ मध्ये लग्न झाले होते. सुरुवातीच्या काळात अब्दुल्ला कुटुंबीयांनी या दोघांच्या लग्नाला मान्यता दिली नव्हती. लग्नानंतर काही महिन्यांनीच सचिन पायलट हे राजकारणात उतरले. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी दौसा मतदारसंघातून पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती अन् ते विजयी झाले होते. त्याकाळी सर्वात युवा खासदार अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर काही काळाने अब्दुल्ला कुटुंबीयांनीही आपली नाराजी विसरून सचिन पायलट यांचा जावई म्हणून स्वीकार केला होता.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.