Rajasthan Assembly Results 2023 : राजस्थानच्या CM पदाचे दावेदार बाबा बालकनाथ आघाडीवर

Baba Balak Nath News : बाबा बालकनाथ सध्या अलवर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
Balak Nath Yogi News
Balak Nath Yogi NewsSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Assembly Election 2023 Result in Marathi : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. तिजोरी मतदारसंघातून राजस्थानचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले बाबा बालकनाथ आणि इम्रान खान यांच्यात लढत होत आहे. राजस्थानचे योगी म्हणून ओळखले जाणारे बाबा बालकनाथ हे आघाडीवर आहेत. भाजपला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीत असतील, असे बोलले जाते.

पहिल्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ८ हजार ३६४ मते मिळाली असून, इम्रान खान केवळ ९२८ मते मिळाली आहेत. सुरुवातीपासून बाबा बालकनाथ यांनी आघाडी घेतली आहे. बाबा बालकनाथ सध्या अलवर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. आता ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Balak Nath Yogi News
Rajasthan Exit Polls : कोण आहेत बालकनाथ?; राजस्थानच्या CM पदासाठी जनतेची पसंती; वसुंधरा राजे, पायलटही पडले मागे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच भगवाधारी बाबा बालकनाथ हेही नाथ संप्रदायाच्या मठाचे महंत आहेत. महंत बालकनाथ योगी हे अलवर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिजारा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. भाजपच्या फायरब्रँड नेत्यांमध्ये समावेश असलेल्या बालकनाथ यांचा पोषाख हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखाच आहे. यामुळे राजस्थानचा योगी म्हणून त्यांना ओळखले जाते.

अलवर आणि आजूबाजूच्या भागात बालकनाथ यांची पकड घट्ट आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीतही भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. यासोबतच भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंड्यातही ते फिट बसतात. निवडणुकीपूर्वी भाजपने राजस्थान प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, त्यावेळी त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले.

टपाल मतांची मोजणी झाली आहे. ज्यात राज्यवर्धन राठोड पिछाडीवर आहेत. ते जयपूर ग्रामीणमधील झोतवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या जागेसाठी सगळ्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अभिषेक चौधरी रिंगणात आहेत. बसपकडून अशोक कुमार शर्मा निवडणूक लढवत आहेत. राठोड यांना केंद्र सरकारनं २००५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Balak Nath Yogi News
Rajasthan Assembly Results 2023 : भाजपने बहुमताचा आकडा गाठला; राज्यवर्धन सिंह राठोड पिछाडीवर, पायलट आघाडीवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com