BJP MLA to officers : अधिकारी पैसे घेतात, त्यांना मारेन! भाजपच्या महिला आमदाराची मंत्र्यासमोरच धमकी

Bhajanlal Government Anita Bhadel : राजस्थानमधील अधिकारी लोकांकडून पैसे घेऊन कामे करत असल्याचा आरोप भाजप आमदार अनिता भदेल यांनी केला आहे.
Anita Bhadel
Anita BhadelSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : राजस्थानातील भजनलाल सरकारमधील अधिकाऱ्यांवर भाजपच्या महिला आमदार चांगल्याच संतापल्याचे पाहायला मिळाले. अधिकारी पैसे घेऊन कामे करत असल्याचे सांगत त्यांनी हे थांबले नाही तर मी त्यांना मारेन, अशी धमकीही दिली. कॅबिनेट मंत्र्यांसमोरच त्यांच्या भडका उडाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

अजमेर येथे झालेल्या एका जनसुनावणीदरम्यान भाजप आमदार अनिता भदेल यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी नगरविकास मंत्री झाबर सिंह खर्रा उपस्थित होते. भदेल म्हणाल्या, अधिकारी कोणत्याही चुकीशिवाय नागरिकांचे घर, गोदाम जप्त करत आहेत. हे थांबले नाही तर मीच त्यांना मारेन.

Anita Bhadel
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील भाषणावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आव्हान; म्हणाले, या फिरून बघा, पडताळणी करा!

आमदाराचा फोन घेत नाहीत

लोकांवर कारवाई करताना ना नोटीस दिली जात आहे ना कारवाईबाबत कोणता कागद दाखवला जातो. गॅस गोदामांच्या जप्तीमुळे 15 हजार ग्राहकांना त्रास होत आहे. सगळ्यांकडे वैध कागदपत्रे आहेत. पण उपायुक्तांसह कुणीही अधिकारी आमदारांचे फोनही उचलत नाही. फोन केला तर पीडितांकडे 50 हजारांची मागणी करत असल्याचा आरोपही भदेल यांनी केला.

मंत्र्यांकडून थेट फोन

आमदार भदेल यांनी यावेळी उपायुक्तांना मंत्र्यांनीच फोन करण्याची विनंती केली. त्यानंतर मंत्र्यांनी लगेच त्यांना फोनही लावला. पण त्यानंतरही उपायुक्तांनी फोन उचलला नाही. त्यानंतर मंत्री संतापले. त्यांनी आमदारांना आश्वासन दिले की, या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

Anita Bhadel
Assembly Election : प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री अडचणीत? खासगी सचिवांच्या घरी IT विभागाची रेड

अधिकाऱ्यांची बदली

मंत्र्यांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर लगेचच महापालिका आयुक्तांनी कारवाईही केली. संबंधित उपायुक्तांना हटवले नसले तरी त्यांच्या झोन तातडीने बदलण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा संपूर्ण अजमेरमध्ये सुरू आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com