Ashok Gehlot News: राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावला माईक?; व्हिडिओ व्हायरल

Rajasthan News: अशोक गेहलोत हे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांचा माईक अचानक बंद पडला.
Chief Minister Ashok Gehlot
Chief Minister Ashok GehlotSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माईक भिरकावल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील असल्याचं सांगण्यात येत असून त्यांनी हा माईक जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

अशोक गेहलोत हे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांचा माईक अचानक बंद पडला. त्यांनी माईक सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण तो सुरू झाला नाही. त्यानंतर त्यांनी बंद पडलेला माईक जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Chief Minister Ashok Gehlot
Gehlot Vs Pilot : राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप? सचिन पायलट यांचा गेहलोत सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम; म्हणाले...

व्हिडिओत नेमकं काय?

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माईक भिरकावल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री गेहलोत हे एका कार्यक्रमात राज्य सरकारच्या योजनांची माहिती देत होते. पण माहिती देत असताना माईक अचानक बंद पडला. माईक बंद पडल्याने अशोक गेहलोत चांगलेच चिडले.

त्यानंतर अशोक गेहलोत यांनी त्यांच्या हातातील माईक जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावला. यानंतर त्यांनी फेकलेला माईक जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला. मुख्यमंत्री गेहलोत यांना यानंतर दुसरा माईक देण्यात आला.

त्यानंतर त्यांनी पुढे बोलण्यास सुरवात केली. मात्र, या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या या कृतीमुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com