Congress Vs BJP : काँग्रेस की भाजप..! राजस्थानमध्ये सत्तेचे काय आहे गणित ?

Rajasthan Assembly Election : राजस्थानात 200 पैकी 199 विधानसभेच्या जागांसाठी मतदान
Rajasthan BJP and Congress
Rajasthan BJP and CongressSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Political News : राजस्थानमधील 33 जिल्ह्यांमधील एकूण 200 पैकी 199 विधानसभेच्या जागांसाठी मतदान पार पडले. निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या ताकदीने उतरल्याने यंदा तब्बल 75.45 टक्के मतदान झाले आहे. हे मतदान 2018 मधील निवडणुकीपेक्षा जास्त आहे. परिणामी जास्तीचे मतदान कुणाला तारणार अन् कुणाला मारणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे.

राजस्थान विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांवर मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेस उमेदवार गुरमीत सिंह कुणार यांच्या निधनानंतर करनपूर मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह एक हजार 800 हून अधिक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.

Rajasthan BJP and Congress
Maratha Vs OBC : पुण्यातील मागासवर्गीय आयोगाची बैठक ठरणार वादग्रस्त ! काय आहेत कारणं ?

राजस्थानमध्ये गेल्या तीन दशकांपासून राज्य कारभारात पक्षबदलाची परंपरा आहे. आता काँग्रेसकडे सत्ता कायम राहणार, की परंपरेनुसार सत्तांतर होऊन राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येणार, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, सत्तेचे खरे सुख कुणाला लाभणार हे 3 डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकार स्थापनेसाठी राजस्थानमध्ये किमान 101 जागांचे बहुमत हवे असते. या वेळी मात्र 100 जागा असणे गरजेचे आहे. दरम्यान, 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने 200 पैकी 99 जागा जिंकल्या, तर भाजपने 73 जागा जिंकल्या होत्या, तर 2013 मध्ये भाजपने 163 जागा जिंकून राज्यात सरकार स्थापन केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Rajasthan BJP and Congress
Maratha Reservation : सत्तेतील शक्तिशाली व्यक्तीने प्रोफेशनल गुंडांकडून बीडमध्ये घडवली जाळपोळ; रोहित पवारांचा रोख कुणाकडे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com