Maratha Reservation : सत्तेतील शक्तिशाली व्यक्तीने प्रोफेशनल गुंडांकडून बीडमध्ये घडवली जाळपोळ; रोहित पवारांचा रोख कुणाकडे?

Rohit Pawar On Maratha Reservation And Lok Sabha Election : बीडमधील जाळपोळीबाबत रोहित पवार यांनी मोठे विधान केले असून, गंभीर आरोपही केला आहे....
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Issue In Maharashtra : राज्यात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी असा वाद सुरू आहे. अशातच मराठा आंदोलनाच्या काळात बीडमध्ये झालेल्या जाळपोळीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठे विधान केले आहे. बीडमधील जाळपोळ ही लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar
Maratha Reservation : शिंदे समिती रद्द होणार ? मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरणार...

बीडमध्ये जी जाळपोळ झाली, त्यामागे सत्तेत असलेल्या एका शक्तिशाली व्यक्तीचा हात होता. बीडमध्ये सात तास जाळपोळ सुरू होती. तरीही पोलिस शांत बसले होते. सत्तेतला एखादा व्यक्ती आदेश देतो तेव्हाच पोलिस शांत बसतात. अशा परिस्थितीत तिथे जाळपोळ करत मराठा आणि ओबीसी समाजातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न तिथे झाला, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

बीडमध्ये जे घडलं ते लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय द्वेषातून आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी केलं गेलं. ( Maratha Obc Reservation ) आता जानेवारीपासूनच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रोफेशनल गुंड आणून अशा प्रकारे जाळपोळ करण्यात येत असेल, तर जनतेने हे समजून घ्यावं, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

Rohit Pawar
Maratha Reservation : भुजबळांची जी मागणी, तीच सरकारची भूमिका : मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली मोठी माहिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com