Rajasthan Mayor Election: राजस्थानमधील प्रतिष्ठेच्या 3 महापालिकांच्या महापौर निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, तर काँग्रेस अन् गेहलोतांना धक्का

Mayor Election: राजस्थानमध्ये 10 पैकी 9 महापालिकांमध्ये भाजपचे महापौर झाले आहेत. जयपूर, जोधपूर, कोटा, उदयपूर, अजमेर, अलवर, पाली, भीलवाडा आणि भरतपूर या 9 महापालिकांमध्ये भाजपचे महापौर झाले होते.
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on: 
Updated on: 

Rajasthan News: राजस्थानमध्ये जयपूर, जोधपूर आणि कोटा महापालिकांच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक यश मिळवलं. तर काँग्रेसला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानमधील जयपूर, जोधपूर आणि कोटा या तीन महापालिकांमध्ये भाजपचे महापौर झाले आहेत.

राजस्थानमध्ये 10 पैकी 9 महापालिकांमध्ये भाजपचे महापौर झाले आहेत. जयपूर, जोधपूर, कोटा, उदयपूर, अजमेर, अलवर, पाली, भीलवाडा आणि भरतपूर या 9 महापालिकांमध्ये भाजपचे महापौर झाले होते.

तर बीकानेर ही एकमेव महापालिका होती, जिथे काँग्रेसचा महापौर झाला.यापूर्वी 21 सप्टेंबर रोजी 7 महापालिकांसह 303 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापौर, सभापती आणि अध्यक्षांची निवड करण्यात आली होती.

काँग्रेसला या तीनही महापालिकांमध्ये क्रॉस व्होटिंगचा मोठा फटका सहन करावा लागल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांचा दबदबा राहिलेल्या जोधपूरमध्येही भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली. तिथे काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.

BJP, Congress
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावर; मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत दोन दिवस दुष्काळ पाहणी

कोटामध्ये भाजपच्या महापौर झालेल्या अनुसुईया गोस्वामी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घराच्या पायऱ्यांवर धोक (नतमस्तक होऊन अभिवादन) केलं. कोटाच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर पदभार स्वीकारताना अनुसुईया गोस्वामी खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

कोटामध्ये भाजपचे नगरसेवक पगडी परिधान करून मतदानासाठी पोहोचले.जयपूरमध्ये मतदानापूर्वी नगरसेवकांनी दंडवत घालून धोक दिली. जयपूरमध्ये मतदानाच्या वेळी काँग्रेसचे आमदार रफीक खान यांना महापालिका कार्यालयात जाण्यापासून रोखण्यात आले.त्यानंतर त्यांनी गोंधळ घातला.

BJP, Congress
Gyanesh Kumar FIR : SIR वरून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात FIRची तयारी; सुषमा अंधारेंचा मोठा दावा

कोटामध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राखी गौतम यांना रोखण्यात आले.यावेळी त्यांनी पक्षपाताचा आरोप केला. दोन नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठीही निवडणूक खाटूश्यामजी नगरपालिकेतील अध्यक्षपदाची मतमोजणी स्थगित करण्यात आली. सीकर जिल्ह्यातील खाटूश्यामजी नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी 21 सप्टेंबर रोजी 20 पैकी 19 मते पडली होती. काँग्रेसच्या एका नगरसेविका ‘बेपत्ता’ झाल्यामुळे त्या मतदान करू शकल्या नव्हत्या.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार विनीता यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आदेश देत, टाकण्यात आलेल्या 19 मतांचीच मोजणी करण्याचे निर्देश दिले होते. आज मतमोजणी होणे प्रस्तावित होते. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाची सत्यापित प्रत मिळाली नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत मतमोजणी स्थगित करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com