Rajeev Kumar
Rajeev KumarSarkarnama

Rajeev Kumar Helicopter Emergency landing : मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या हेलिकॉप्टरचं शेतात आपत्कालीन 'लँडिंग'

Central Election Commissioner Rajeev Kumar News : जाणून घ्या, नेमकं काय घडलं आणि हेलिकॉप्टरमध्ये आणखी कोण होतं ; या घटननंतर ग्रामस्थांनी घेतली धाव!
Published on

Rajeev Kumar Helicopter Emergency landing in Uttarakhand : उत्तराखंडच्या पिथौरगढ जिल्ह्यात केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी डॉ. विजय कुमार जोगदंडे यांच्या हेलिकॉप्टरचं इमरजन्सी लँडिंग करावं लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना त्यावेळी घडली जेव्हा दोन्ही वरिष्ठ अधिकारी बुधवारी तीन दिवसीय दौऱ्यावर हेलिकॉप्टरद्वारे मिलम क्षेत्रात जात होते.

दरम्यान वातावरण अचानक खराब झाल्याने, चालकासमोर हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्याशिवाय पर्याय नव्हता. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार(Rajeev Kumar) आणि राज्याचे उप मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. विजय कुमार जोगदंडे यांचा पिथौरगड मुस्यारीतील मिलम भागात तीन दिवसीय दौरा नियोजित होता.

Rajeev Kumar
Election Commission On Exit polls : 'एक्झिट पोल्स' अन् मीडियाच्या अतिउतावीळपणावर निवडणूक आयोगाने ठेवलं बोट!

वातावरण खराब असल्या कारणाने चालकाने सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टरची रालम भागातील एका शेतात आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने या आपत्कालीन लँडिंगच्यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. चालक आणि अधिकाऱ्यांसह निवडणूक आयुक्त सुखरूप आहेत. परिसरातील स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली होती.

Rajeev Kumar
Election Commission on Rashmi Shukla : रश्मी शुक्लांबाबत काँग्रेसच्या 'त्या' मागणीवर अखेर निवडणूक आयोगाने स्पष्ट केली भूमिका!

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवामानात सुधारणा होताच केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या टीमला त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. ही आपत्कालीन परिस्थिती असतानाही केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा दौरा सुरूच राहणार असून, ते लवकरच आपल्या नियोजित कार्यक्रमांचा भाग म्हणून दुर्गम भागांना भेट देणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com