Chief Election Commissioner : महाराष्ट्रात एक अन् झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान का? राजीव कुमार यांनी स्पष्टच सांगितलं...

Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभेचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. मात्र, झारखंडमध्ये दोन टप्प्यात आणि महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होत असल्यानं अनेकांना सवाल पडला होता.
Rajiv kumar
Rajiv kumarsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha Election: बहुप्रतीक्षित अशा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं ‘बिगुल’ वाजलं आहे. पाच वर्षांत बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होते. अखेर विधानसभा निवडणूक घोषित झाली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासह झारखंडमध्येही निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.

मात्र, महाराष्ट्रासारख्या बड्या राज्यात एका टप्प्यात आणि झारखंडसारख्या छोट्या राज्यात दोन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. यामुळे महाराष्ट्रात एका आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर निवडणूक आयोगाचे ( Election Commission ) आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिलं आहे.

राजीव कुमार म्हणाले, “मागील वेळी झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. यंदा दोन टप्प्यात होत आहे. यापाठीमागे झारखंडमधील नक्षल परिसरासह काही अन्य कारणे आहेत. मात्र, महाराष्ट्रात अशी परिस्थिती नसल्यानं तिथे एका टप्प्यात मतदान होत आहे.”

Rajiv kumar
Bypolls Election Dates : नांदेडची पोटनिवडणूक जाहीर; वायनाड लोकसभेसह 48 विधानसभा मतदारसंघांमध्येही रणसंग्राम; असे आहे वेळापत्रक...

महाराष्ट्रात कसा असेल निवडणूक ‘कार्यक्रम’?

20 नोव्हेंबर 2024 ला राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, 23 नोव्हेंबर 2024 ला मतमोजणी होईल. 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी होईल. 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com