निवृत्तीच्या दिवशी IPS अधिकाऱ्याने परिधान केली राजीव गांधींच्या रक्ताने माखलेली टोपी

पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) श्रीपेरबंदूर येथे निवडणूक प्रचारासाठी आले होते. त्यावेळी मानवी बॉम्बने स्फोट घडवून आणून त्यांची हत्या केली.
 prateep philip
prateep philipsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची १९९१ मध्ये हत्या झाली होती. याच १४ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्यात जखमी झालेले आयपीएस अधिकारी प्रतिप फिलिप (Pratip Philip) यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी रक्ताने माखलेली टोपी आणि नेम प्लेट घातली. या टोपी अन् नेम प्लेटवर राजीव गांधी यांच्या रक्ताचे डाग आहेत. प्रतीप फिलीप यांच्या बाबतीत त्या वस्तू महत्त्वाच्या होत्या, कारण त्यांच्याशी काही महत्त्वपूर्ण आठवणी त्या वस्तूंशी जोडल्या गेल्या होत्या.

न्यायालयाने प्रतिप फिलिप यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी या वस्तू परिधान करण्याची परवानगी दिली होती. तमिळनाडूचे पोलीस महासंचालक प्रतिप फिलिप (Pratip Philip) हे नुकतेच निवृत्त झाले. निवृत्तीच्या दिवशी त्यांनी रक्ताने माखलेली टोपी घातली होती. राजीव गांधी यांची हत्या या विषयावर फिलिप हे पुस्तक लिहिणार आहेत. २१ मे १९९१ रोजी रात्री माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) श्रीपेरबंदूर येथे निवडणूक प्रचारासाठी आले होते. त्यावेळी मानवी बॉम्बने स्फोट घडवून आणून त्यांची हत्या केली. त्या हल्ल्यात अनेक जण जखमीही झाले होते.

 prateep philip
काका-पुतण्याचा 'बंगला' गोठविला ; निवडणूक आयोगाचा दणका

तपास यंत्रणेने स्फोटाच्या स्थळावरून पुराव्यांसाठी अनेक वस्तू जमा केल्या होत्या. यामध्ये फिलिप यांची रक्ताचे माखलेली कॅप आणि नावाचा बॅज यांचाही समावेश होता. ट्रायल कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये या वस्तूंना ‘मटेरियल ऑब्जेक्ट्स नंबर ३८ अँड ३९ अशी नावे देण्यात आली होती. या घटनेनंतर या दोन्ही वस्तू कोर्टाच्या ताब्यात होत्या. मात्र या वस्तूंशी प्रतीप फिलीपल यांचं भावनिक नातं असल्याने आपल्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या दिवशी या वस्तू परिधान कराव्यात अशी त्यांची इच्छा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com