Narendra Modi : राजीव गांधींनी संविधानाला धक्का दिला; पीएम मोदींनी केला गंभीर आरोप

Political News : संविधान बदलून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. त्यासोबतच संविधान निर्मात्यांचा अपमानदेखील काँग्रेसनेच केला आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील भाषणावेळी केला.
narendra modi (1).jpg
narendra modi (1).jpgsarkarnama
Published on
Updated on

Parliament Winter Session : संविधानला आव्हान देण्याचे काम यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने केले आहे. काँग्रेसच्या एका परिवारानेच संविधानला धक्का दिला आहे. राजीव गांधींनी त्यांच्या सरकारच्या काळात कट्टर पंथियाना समर्थन देत संविधनाला धक्का देण्याचे काम केले आहे. संविधान बदलून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. त्यासोबतच संविधान निर्मात्यांचा अपमानदेखील काँग्रेसनेच केला आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील भाषणावेळी केला.

संसदेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विविधतेत एकता ही भारताची विशेषता आहे. अनेकांकडून देशाच्या या विविधतेत विष पेरण्याचे काम केले जात आहे. काही जण विविधतेत विरोधभास शोधत आहेत. देशाच्या एकतेला मजबुती देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला आहे. देशातील एकता हीच आमची प्राथमीकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

narendra modi (1).jpg
Rahul Gandhi : संविधान अन् मनुस्मृतीची प्रत दाखवत राहुल गांधींची भाजपवर टीका; म्हणाले, ' सरकारने युवकांचे अंगठे कापले...'

महिलांची संविधान निर्मितीत मोलाचे योगदान आहे. येणाऱ्या पिढीला संस्कारक्षम घडविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. ज्यावेळी संविधानाला 25 वर्ष पूर्ण झाले होते, त्यावेळी काही जणांनी संविधान संपविण्याचा प्रयत्न केला होता. आणिबाणीच्या काळात ही संविधान संपवण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. ही काँग्रेसने (Congress) केलेली पापे कधीच धुतली जाणार नसल्याचा आरोपही यावेळी पीएम मोदी यांनी केला.

narendra modi (1).jpg
Pune BJP : भाजपची 'एकला चलो रे'ची भूमिका! महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते लागले कामाला

देश जेव्हा संविधानाचे 25 वे वर्ष साजरा करत होता, तेव्हा यांनी आणीबाणी आणली, नागरिकांचे अधिकार हिसकावून घेतले. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हिरावलं, लोकांना तुरुंगात टाकलं, देशाला तुरुंगखाना बनवलं. काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसले जाणार नाही. जगात जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या कपाळावरील पापाची चर्चा होईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

narendra modi (1).jpg
Nana Patole : प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच नाना पटोले 'या' पदावर दावा करण्याची शक्यता

संविधानाच्या 50 व्या वर्षी वाजपेयींनी हा दिवस साजरा केला होता. संविधानावर चर्चा घडवून आणली होती. मलाही संविधानाच्या प्रक्रियेतूनच मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. मी मुख्यमंत्री असताना संविधानाला 60 वर्ष झाले होते. तेव्हा संविधानाचा 60 वा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आम्ही संविधानाची प्रत हत्तीवर ठेवून रॅली काढली, तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री संविधानाच्या खाली पायी चालत होता. आमच्यासाठी संविधानाचं मोठं महत्त्व आहे. आज संविधानाला 75 वर्ष होत आहेत. मला त्यावर बोलण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

narendra modi (1).jpg
PM Modi News : संविधान निर्मितीत अन् सशक्तिकरणात नारीशक्तीची मोठी भूमिका - पंतप्रधान मोदी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com