MP Rajveer Diller
MP Rajveer DillerSarkarnama

Rajveer Singh Diler : हाथरसचे भाजपा खासदार राजवीर सिंह दिलेर यांचे निधन!

Loksabha Election 2024 : 2019च्या लोकसभा निवडणुकीत अडीच लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते

Uttar Pradesh BJP : उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजवीर सिंह दिलेर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अलीगड येथील वरुण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. मात्र, यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कुटुंबीय, पक्ष व समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.

खासदार राजीवर सिंह दिलेर(Rajveer Singh Diler) त्यांच्या निवासस्थानी असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Rajveer Diller
PM Narendra Modi News : मोदींसारख्या नेत्याची अमेरिकेतही गरज! बड्या कंपनीचे अध्यक्ष पंतप्रधानांवर भलतेच खूष

राजवीर हे पक्षाचे ते खासदार होते ज्यांचे नाव गेल्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झालेल्या भाजप(BJP) उमेदवारांच्या यादीत समाविष्ट होते. ते अडीच लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. मात्र, यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. यावेळी त्यांच्या जागी भाजपने राज्यमंत्री अनुप वाल्मिकी यांच्यावर विश्वास टाकला आहे.

कैरानाचे भाजप खासदार प्रदीप चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून दिलर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, हातरसचे खासदार राजवीर दिलर जी, माझे अत्यंत प्रिय मित्र आणि मोठ्या भावासारखे होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या दु:खद बातमीने धक्का बसला आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे असह्य दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

MP Rajveer Diller
Lok Sabha Election 2024 : अखेर अखिलेश यादवही लोकसभेच्या रिंगणात; लालूंच्या जावयाचा पत्ता कट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com