Lok Sabha Election 2024 : अखेर अखिलेश यादवही लोकसभेच्या रिंगणात; लालूंच्या जावयाचा पत्ता कट

Akhilesh Yadav News : अखिलेश यादव गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कनौज मतदारसंघाचे त्यांनी यापुर्वीही तिनदा नेतृत्व केले आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh Yadav Sarkarnama

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमध्ये मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. समाजवादी पक्षाने कनौज लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Election 2024) उमेदवार दोन दिवसांतच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या जावयाचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याजागी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे स्वत: उमेदवार असतील. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत आता वाढणार आहे.

कनौज लोकसभा मतदारसंघातून लालूंचे (Lalu Prasad Yadav) जावई तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांना दोन दिवसांपुर्वी उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. अखिलेश (Akhilesh Yadav) यांनी 24 तासांत निर्णय घेण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर आज यादव यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Akhilesh Yadav
Supreme Court on EVM : आम्ही निवडणूक नियंत्रित करू शकत नाही..! सुप्रीम कोर्टानं स्पष्टचं सांगितलं...

समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते रामगोपाल यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. अखिलेश यादव हेच कनौजचे उमेदवार असतील. ते दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कनौजसह उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे (Uttar Pradesh Election News) वातावरण आता चांगलेच तापणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कनौज लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाजपचे (BJP Politics) आहेत. मागील निवडणुकीत भाजपने अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा पराभव केला होता. तर 2014 मध्ये डिंपल यादव याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या मतदारसंघात 1998 पासून सपाचे उमदवार विजयी होत होते. केवळ 2019 ची निवडणूक त्याला अपवाद ठरली.

कनौजमधून स्वत: अखिलेश यादव तीनदा तर डिंपल यादव दोनदा आणि मुलायम सिंह यादव एकदा खासदार होते. भाजपचे सुब्रत पाठक विद्यमान खासदार आहेत. यावेळीही त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. अखिलेश निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने कनौज हा हायप्रोफाईल मतदारसंघ ठरणार आहे.

भाच्याचा पत्ता कापून अखिलेश मैदानात

सपाने दोन दिवसांपुर्वी तेजप्रताप यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती. ते लालू प्रसाद यादव यांचे जावई आहेत. तर मुलायम सिंह यादव यांचे पुतणीचे पुत्र असून अखिलेश यांचे भाचे आहेत. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तेजप्रताप यांनी मैनपुरी लोकसभा मतदारसंघाचे एकदा प्रतिनिधित्वही केले आहे. यावेळी या मतदारसंघातून डिंपल यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी लालूंचे जावई तेजप्रताप निवडणुकीच्या रिंगणात नसतील, हे स्पष्ट झाले आहे.     

Akhilesh Yadav
Rahul Gandhi : राहुल गांधींनी सांगितले सरकार आल्यावर कसे 'ठका ठक, ठका ठक....' पैसे टाकणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com