Rajya Sabha Election 2024 : भाजपकडून राज्यसभेसाठी सात राज्यातील 14 उमेदवारांची घोषणा

RPN Singh : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते आरपीएन सिंह यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून आज चौदा उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक सात उमेदवार एकट्या उत्तर प्रदेशातील आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आर.पी.एन सिंह यांच्या प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी या राज्यातील उमेदवारी जाहीर झाली आहे. (Rajya Sabha Election 2024)

भाजपकडून (BJP) बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हरयाणा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील उमेदवारांची नावांची यादी आज प्रसिध्द केली आहे. राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा जागांचाही त्यामध्ये समावेश आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत महाराष्ट्रातील एक नाव नाही.

BJP
Rajya Sabha Election 2024 : पत्रकार सागरिका घोष यांच्यासह सुश्मिता देव, ममता ठाकूरांना राज्यसभेची उमेदवारी

असे आहेत भाजपचे उमेदवार –

बिहार – डॉ. धर्मशीला गुप्ता व डॉ. भीम सिंह

छत्तीसगड – राजा देवेंद्र प्रताप सिंह

हरयाणा – सुभाष बराला

कर्नाटक – नारायण कृष्णासा भांडगे

उत्तर प्रदेश – आर. पी. एन. सिंह, डॉ. सुधांशु त्रिवेदी, चौधरी तेजवीर सिंह, साधना सिंह, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, नवीन जैन

उत्तराखंड – महेंद्र भट्ट

पश्चिम बंगाल – सामिक भट्टाचार्य

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तृणमूलकडून चार जणांना उमेदवारी

तृणमूल काँग्रेसकडून (TMC) आज चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली. बंगालमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. सागरिका घोष (Sagrika Ghosh) या पत्रकार आणि लेख असून त्यांना राजकीय बातमीदारी मोठा अनुभव आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांवर त्यांनी लेखनही केले आहे. त्या ममता बॅनर्जी यांच्या निकवर्तीय मानल्या जातात.

सुश्मिता देव या सध्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार होता. ममतांनी त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. सिलचार लोकसभा मतदारसंघाच्या त्या खासदारही होत्या. तर माजी खासदार ममता बाळा ठाकूर यांनाही राज्यसभेत पाठवले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com