Rajya Sabha Election 2024 : पत्रकार सागरिका घोष यांच्यासह सुश्मिता देव, ममता ठाकूरांना राज्यसभेची उमेदवारी

Trinamool Congress : ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसकडून चार जणांना उमेदवारी दिली असून त्यामध्ये तीन उमेदवार महिला आहेत.
Sagarika Ghosh, Mamata Bala Thakur, Sushmita Dev
Sagarika Ghosh, Mamata Bala Thakur, Sushmita DevSarkarnama
Published on
Updated on

West Bengal : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी देशभरात सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. पश्चिम बंगालमध्ये पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेसने रविवारी चार उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये पत्रकार सागरिका घोष यांच्यासह सुश्मिता देव, ममता बाळा ठाकूर आणि नदीमूल हक यांचा समावेश आहे. (Rajya Sabha Election 2024 )

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी चार उमेदवारांमध्ये तीन महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर त्यांनी महिलांना मतदारांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. बंगालमध्ये ममतांच्या पक्षाला सहजपणे चार जागा मिळू शकतात. तर एक जागा भाजपला मिळू शकते.

Sagarika Ghosh, Mamata Bala Thakur, Sushmita Dev
Acharya Pramod Krishnam News : काँग्रेसमधून निलंबित करताच आचार्य प्रमोद यांनी राम अन् राष्ट्र म्हणत विषय संपवला...

देशातील 15 राज्यांमधील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी तृणमूलकडून (TMC) ट्विटरवरून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली. सागरिका घोष (Sagrika Ghosh) या पत्रकार आणि लेख असून त्यांना राजकीय बातमीदारी मोठा अनुभव आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांवर त्यांनी लेखनही केले आहे. त्या ममता बॅनर्जी यांच्या निकवर्तीय मानल्या जातात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुश्मिता देव या सध्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार होता. ममतांनी त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. सिलचार लोकसभा मतदारसंघाच्या त्या खासदारही होत्या. तर माजी खासदार ममता बाळा ठाकूर यांनाही राज्यसभेत पाठवले जाणार आहे. त्या बानगांवर मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी होत्या.

नदिमूल हक हे तृणमूल काँग्रेसचा मुस्लिम चेहरा मानले जातात. तसेच ममता बॅनर्जी यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेत सध्या 13 सदस्य आहे. भाजप (93) आणि काँग्रेस (30) नंतर तृणमूल तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

Sagarika Ghosh, Mamata Bala Thakur, Sushmita Dev
Farmers Protest : शेतकऱ्यांचे 'चलो दिल्ली; मोदी सरकारच्या अडचणी वाढणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com