Rajya Sabha Session : मर्यादेत राहा! जगदीप धनखड यांचा पारा चढला, खर्गेंना सुनावलं...

Jagdeep Dhankhar Mallikarjun Kharge Waynad Landslide : वायनाड येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यसभेत उमटले.
Jagdeep Dhankhar, Mallikarjun Kharge
Jagdeep Dhankhar, Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केरळातील वायनाडमध्ये मध्यरात्री झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यसभेतही उमटले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पण यादरम्यान राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि खर्गे यांच्यात खडाजंगी झाली.

मल्लिकार्जून खर्गे यांनी वायनाडमधील दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करण्याआधी धनखड यांनी तेथील स्थितीची माहिती सभागृहाला दिली. सुर्योद्य होण्याआधीपासून बचावकार्य सुरू झाले असून केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारची यंत्रणा मिळून हे काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Jagdeep Dhankhar, Mallikarjun Kharge
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात 40 हजार मतांचा घोळ; रविंद्र वायकरांच्या मतदारसंघातही विसंगती, ADR चा अहवाल 

धनखड यांच्यानंतर खर्गे यांनी याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी लावून धरली. बचावकार्य कसे सुरू आहे, कोणत्या यंत्रणा कार्यरत आहेत, काय मदत केली जात आहे, आदी माहिती सरकारने द्यावी, असे ते म्हणाले. मात्र, त्यावरून धनखड संतापलेले दिसले. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मी समजलो. मला माहिती आहे, मी काय माहिती द्यायला हवी. मेहरबानी करून तुम्ही मर्यादित आचरण करा, असे धनखड यांनी सुनावलं.

केरळमधील खासदारांनीही बोलू देण्याची मागणी केली. त्यानंतर सर्वच पक्षाच्या खासदारांनी आपले म्हणणे मांडले. सरकारकडून सभागृहाचे नेते जे. पी. नड्डा यांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांमध्ये दुरध्वनीवरून चर्चा झाली असून बचावकार्यासाठी सर्वप्रकारची मदत केली जात आहे केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांना त्याठिकाणी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.

Jagdeep Dhankhar, Mallikarjun Kharge
Nawab Malik : मोठी बातमी! विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा मलिकांना दिलासा

राहुल व प्रियांका गांधी उद्या जाणार

दरम्यान, वायनाड मतदारसंघाचे माजी खासदार राहुल गांधी व या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढणार असलेल्या प्रियांका गांधी बुधवारी घटनास्थळी भेट देणार असल्याचे समजते. पंतप्रधान मोदींसह राहुल यांनीही सकाळी एक्सवर पोस्ट करत या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com