Nawab Malik
Nawab MalikSarkarnama

Nawab Malik : मोठी बातमी! विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा मलिकांना दिलासा

Nawab Malik : नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर तुरूंगाबाहेर आहेत.
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नबाव मलिक यांना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव देण्यात आलेल्या जामिनास मुदतवाढ दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात नियमित जामीन याचिका निघेपर्यंत जामीन लागू राहील, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं.

सक्तवसुली संचालनालयानं ( ईडी ) नवाब मलिकांच्या ( Nawab Malik ) जामिनास कोणतीही कोणताही विरोध दर्शवला नाही. मलिक हे काही दिवसांपासून जामिनावर बाहेर आहेत. मलिक यांनी जामिनाला मुदतवाढ मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला होता. यापूर्वी मलिकांना एक आठवडा किंवा दोन आठवडे, अशी मुदत मिळत होती. त्यामुळे सातत्यानं अंतरिम जामिनासाठी मलिकांना अर्ज करावा लागत होता.

Nawab Malik
MLA Disqualification Case: महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा दिवस: एकाच दिवशी शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदारांचा 'फैसला'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना 2022 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. मलिकांवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांसोबत पैशांचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट 2023 मध्ये अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचे कारण देत जामीना मिळावा, अशी मागणी मलिकांनी केली होती.-

Nawab Malik
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंविरोधात मराठा समाज आक्रमक, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला; नेमकं काय घडतंय?

दरम्यान, नवाब मलिक यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर शरद पवारसाहेब की अजितदादा, अशी भूमिका स्पष्ट केली नव्हती. पण, काही दिवसांपूर्वी मलिकांनी अजितदादांच्या बैठकांना उपस्थिती लावली होती. मलिक हे अजितदादांच्या गटात असल्याचं बोललं जात आहे. यातच विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मलिक हे पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघातून लढू शकतात. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यानं मलिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com