Video Rajya Sabha Session Live : राज्यसभेतच महिला खासदार बेशुध्द पडल्या; तातडीने रुग्णालयात केले दाखल  

Parliament Session Update Congress MP Phulo Devi Netam : काँग्रेसच्या छत्तीसगडमधील खासगार फुलो देवी नेताम या राज्यसभेत नीट विरोधात निदर्शने करत होत्या.
Phulo Devi Netam
Phulo Devi NetamSarkarnama

New Delhi : संसदेच्या अधिवेशनादरम्यान शुक्रवारी राज्यसभेत एका महिला खासदारांना अचानक चक्कर आली. त्या सभागृहातच बेशुध्द पडल्यानंतर त्यांना तातडीने आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर महिला खासदार त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन गेल्या.

काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार फुलो देवी या शुक्रवारी इतर खासदारांसोबत नीटवर चर्चेसाठी आवाज उठवत होत्या. नीटवर सविस्तर चर्चेची मागणी खासदारांकडून केली जात होती. यादरम्यान फुलो देवी यांना अचानक चक्कर आली. इतर खासदारांनी त्यांना सावरले.

Phulo Devi Netam
Delhi Rain Update : पाण्यासाठी उपोषण करणाऱ्या मंत्र्यांच्या घरात घुसले पाणी; रेकॉर्डब्रेक पावसाने दाणादाण

फुलो देवी यांना स्ट्रेचरवर संसदेतून बाहेर आणत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांच्यासोबत संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, खासदार स्वाती मालीवाल रजनी पाटील, इम्रान प्रतापगढी आदी दिसत आहेत. फुलो देवी यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यासोबत मालीवाल आणि पाटीलही असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, फुलो देवी नेताम या छत्तीसगढमधील बस्तर भागातील आहेत. त्या 14 सप्टेंबर 2020 पासून राज्यसभेच्या सदस्य आहेत. राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीने त्यांना मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात इतर 12 खासदारांसह निलंबित करण्यात आले होते. संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Phulo Devi Netam
Parliament Session Update : तुम्ही यासाठी संसदेत आलाय का? सागरिका घोष यांच्यावर सभापती भडकले

विशेषाधिकार समितीने गुरूवारी आपला अहवाल सादर केला होता. त्यानंतर फुलो देवी यांच्यासह इतर खासदारांना ताकीद देण्यात आली होती. फुलो देवी यांच्यासह संजय सिंह, शक्तीसिंह गोहिल, सुशील कुमार गुप्ता, संदीप कुमार पाठक, सैयद नासीर हुसैन, जेबी माथेर हिशाम, रंजीत रंजन आणि इम्रान प्रतापगढी या खसादरांचा त्यामध्ये समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com