Video Rajya Sabha Session : जया बच्चन यांच्यावर धनखड संतापले; म्हणाले, तुम्ही असाल सेलिब्रिटी पण..!  विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

Jaya Bachchan Jagdeep Dhankhad : जया बच्चन या आपल्या नावाच्या उल्लेखावरून राज्यसभेत सातत्याने भडकल्याचे दिसून आले आहे.  
Jaya Bachchan, Jagdeep Dhankhad
Jaya Bachchan, Jagdeep DhankhadSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राज्यसभेत शुक्रवारी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. धनखड यांनी बच्चन यांना धारेवर धरत तुम्ही सेलिब्रिटी असला तरी सभागृहाची शिस्त पाळली पाहिजे, अशा शब्दांत खडसावले. त्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला.

विरोधकांनी धनखड यांच्या विधानानंतर सभागृहातून वॉकआऊट केले. त्यानंतर सरकारने विरोधकांच्या या कृतीची निंदा करणारा प्रस्ताव सभागृहात मांडला. या वादाची सुरूवात खासदार घनश्याम तिवारी यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर केलेल्या विधानावरून झाली. जयराम रमेश यांनी त्याबाबत बोलण्याची विनंती धनखड यांना केली.

Jaya Bachchan, Jagdeep Dhankhad
Video Delhi Minister Atishi : विद्यार्थी, पालकांसमोर दिल्लीच्या मंत्री अतिशी स्टेजवरच ढसाढसा रडल्या; नेमकं काय घडलं?

धनखड म्हणाले, ‘आपत्तीजनक काही असेल तर माफी मागायला तिवारी तयार आहेत. पण काहीही आपत्तीजनक नसून त्यावर खर्गेही सहमत आहेत. याची माहिती सभागृहाला व्हावी, असे खर्गेंनी म्हटले. तिवारी यांनी संसदीय भाषेचाच वापर केला.’ त्यावर तिवारी यांनी माफी मागावी, अशी मागणी जयराम रमेश यांनी केली. पण प्रशंसेसाठी कुणी माफी मागत नाही, असे उत्तर धनखड यांनी दिले.

धनखड यांच्या या भूमिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली. आधी जयराम रमेश नंतर प्रमोद तिवारी, अजय माकन यांनी म्हणणे मांडले. त्यानंतर जयदीप धनखड यांनी जया अमिताभ बच्चन असे नाव पुकारले. जया बच्चन बोलण्यासाठी उभ्या राहिल्यानंतर थेट धनखड यांच्या हावभावावर बोलू लागल्या.

Jaya Bachchan, Jagdeep Dhankhad
Creamy Layer in Reservation : SC/ST क्रिमिलेअरबाबत मोठी बातमी; मोदींनी भाजप खासदारांना स्पष्टच सांगितलं...

‘मी एक अभिनेत्री आहे. बॉडी लँग्युएज, एक्सप्रेशन समजू शकते. सर, मला माफ करा, तुमचा जो टोन आहे, तो मला आवडला नाही. तुमचा टोन अस्वीकार्य आहे,’ असे जया बच्चन यांनी म्हणताच धनखड भडकले. ते म्हणाले, जयाजी, तुम्ही खूप काही कमावले आहे. मी दररोज पुनर्रूचार करू इच्छित नाही. दररोज तुमची शाळा घेऊ इच्छित नाही. तुम्ही माझ्या टोनवरून बोलत आहात? मी हे सहन करणार नाही. तुम्ही सेलिब्रिटी असाल, पण तुम्ही डेकोरम मानवाच लागेल, असे शब्दांत धनखड यांनी जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिले.

जया बच्चन आणि धनखड यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर विरोधकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. दादागिरी नहीं चलेगी, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सभागृहातून वॉकआऊट केले. त्याचा सत्ताधारी खासदारांनी निषेध करत निषेध प्रस्ताव सभागृहात मांडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com