Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या खात्याला कोर्टाकडून 5 लाखांचा दंड : लगेचच CM फडणवीस धावले FDAच्या मदतीला

CM Fadnavis on Tukaram Mundhe: पुण्यातील मिठाई दुकानावरील FDA कारवाईप्रकरणी मुंबई हायकोर्टाने ५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. फडणवीसांनी FDAच्या कामाचे कौतुक केले.
CM Fadnavis on Tukaram Mundhe
CM Fadnavis on Tukaram MundheSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करत कारवाई रद्द केली. शिवाय 5 लाखांचा दंडही ठोठावला. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एफडीएच्या कामांचे कौतुक केले आहे. त्यांच्या कामाबाबत निरीक्षण नोंदवत त्यांची पाठराखण केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात FDAकडून उत्तम कारवाई सुरू आहे. सगळ्यात पहिले तर फूड अडल्ट्रेशन किंवा कोणत्याही प्रकारचे मानक आहेत त्यांच्यावर जेव्हा कोणी प्रश्न उपस्थित करतात तेव्हा लोकांच्या जीवाला धोका असतो. लोकांचे आरोग्य धोक्यात असते. त्यामुळे त्यावर सक्त कारवाई करणे गरजेचे होते आणि ही कारवाई होत आहे याचा मला आनंद आहे. ही एफडीएची कारवाई सतत होत राहणार आहे,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे या पुढील काळातही ही कारवाई अशीच सुरु राहणार, हे स्पष्ट आहे.

FDAच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील गुरुनानक डेअरीची 12 जून रोजी तपासणी केली होती. अन्नविषबाधेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही तपासणी करण्यात आली. यावेळी दुकानातील स्वच्छता तसेच कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात काही त्रुटी आढळल्याचे FDAचे म्हणणे होते. त्यानंतर संबंधित दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला.

CM Fadnavis on Tukaram Mundhe
Kunbi Caste Certificate : मराठा समाजाने ओबीसीत ‘घुसखोरी’ केल्याचा दावा किती खरा? 40 लाख कुणबी प्रमाणपत्रांचा आकडा काय सांगतो?

FDAने केलेल्या पुढील तपासणीत मात्र परिस्थितीत मोठी सुधारणा झाल्याचे समोर आले. पुनर्तपासणीमध्ये सुमारे 98 टक्के नियमांचे पालन होत असल्याचे आढळले. त्यामुळे दुकानमालकाने निलंबनाचा आदेश मागे घेण्याची मागणी FDAकडे केली. मात्र या निवेदनावर अपेक्षित निर्णय न झाल्याने अखेर दुकानमालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दुकान दीर्घकाळ बंद राहिल्याने झालेल्या नुकसानीची दखल घेत न्यायालयाने FDAला पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. पुनर्तपासणीच्या माध्यमातून अन्नपदार्थांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा FDAचा उद्देश योग्य असला, तरी कारवाई करताना आवश्यकतेपेक्षा अधिक कठोर भूमिका घेणे टाळले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com