

Ram Temple Controversy : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. सुरूवातीला दान चोरीवरून होत असलेल्या आरोप राजकीय असल्याचा दावा केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात तपास सुरू झाल्यानंतर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जमा झालेले दान मोजण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच घरात लाखो रुपये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
अयोध्या राम मंदिर ट्रस्टकडून जून महिन्याच्या सुरूवातीला ऑडिट करण्यात आले होते. यामध्ये दानपेटीतील रोख रक्कम आणि अन्य काही वस्तू गायब झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ट्रस्टकडून मंदिर, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले. या तपासणीमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या हालचालींवरून संशय आणखी बळावला. त्याआधारे ट्रस्टकडून तपास सुरू करण्यात आला होता. पण ही माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आठ दिवसांपूर्वी दान चोरी झाल्याची माहिती उघड केली. त्यांनी पत्रकार परिषद घेत योगी सरकारवर टीका केली. त्यानंतर हा प्रकरणाचे गांभीर्य वाढत केले. इतर राजकीय पक्षांनीही दान चोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधण्यास सुरूवात केली. त्यानंतर खुद्द भाजप नेत्यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
SIT ची स्थापना
दान चोरीच्या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटीची घोषणा केली. श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या विनंतीनंतर ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टची प्रतिमा खराब केली जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. या प्रकरणातील सत्यता एसआयटीकडून समोर आणली जाईल.
दोन कर्मचारी अटक
पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु झाल्यानंतर शनिवारी दोघांना अटक करण्यात आली. दानपेटीतील दान मोजण्याचे काम करणारा कर्मचारी लवकुश मिश्रा याच्या घरात सुमारे १० लाख रुपयांची रोकड सापडली आहे. एवढे पैसे कुठून आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत अचानक वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
दोघांनाही सुमारे १८ ते २० हजार रुपये वेतन असताना एकाने दीड कोटी रुपये किंमती जमीन खरेदी तर एकाने ४० लाख रुपयांची जागा खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोघांची कसून चौकशी केली जात आहे. दोघांनी दान चोरीतून एवढी माया जमविली की अन्य मार्गाने हे लवकरच समोर येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.