RBI withdraw Rs 2,000 Note : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) चलनातील दोन हजार रुपयांची नोट बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या निर्णयावरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. बॅंक्स दिल्लीचे (नॅफकब) उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनीही यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, " सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन बॅकिंग यंत्रणेवर निश्चितच ताण येणार आहे. हे टाळण्यासाठी सामान्य जनतेला रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरात लवकर स्पष्टीकरण येणे अपेक्षित आहे,"
रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत घेतलेला निर्णय हा नोटबंदीचा प्रकार नाही. येत्या ३० सप्टेंबरनंतरही दोन हजारच्या नोटांची कायदेशीरता अबाधित राहील, असे अनास्कर म्हणाले.
‘नॅफकब’ ही देशातील सर्व सहकारी बँका व पतसंस्थांची शिखर संस्था आहे. 'रिझर्व्ह बॅंकेच्या ‘क्लीन नोट पॉलिसी’नुसार जनतेला व्यवहारात चांगल्या सुस्थितीतील नोटा मिळाल्या पाहिजे. यासाठी १९७५ सालापासून रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारलेल्या धोरणानुसार काही नोटा चलनातून काढून घेण्याचे धोरण यापूर्वीही रिझर्व्ह बॅंकेने राबविले आहे, असे अनास्कर म्हणाले.
"लोकांच्या सोयीसाठी या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. परंतु त्यानंतरही या नोटांची कायदेशीरता कायम राहणार असून, या मुदतीनंतर या नोटा बॅंकेत भरण्याबाबत किंवा बदली करून मिळण्याबाबतचे नियम स्वतंत्रपणे जाहीर केले जातील," असे अनास्करांनी नमूद केले.
"२३ डिसेंबर २०१५ रोजी परिपत्रक जारी करून २००५ पूर्वीच्या नोटा चलनातून काढून घेतल्या होत्या. त्यावेळी ३० जून २०१६ पर्यंत मुदत दिली होती. याच धर्तीवर रिझर्व्ह बॅंकेने आज दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे," असे अनास्कर यांनी सांगितले.
(Edited By : Mangesh Mahale)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.