भाजपची डोकेदुखी वाढली : अधिकृत उमेदवारांविरोधात कार्यकर्त्यांनीच थोपटले दंड

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. राज्यातील ७० विधानसभा जागांसाठी एकूण ७५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
BJP
BJPSarkarnama

उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. राज्यातील ७० विधानसभा जागांसाठी एकूण ७५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस (Congress) नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह ३०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. डेहराडूनमध्ये सर्वाधिक १४४ आणि सर्वात कमी अर्ज १५ चंपावत जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गेल्या २०१७ मधील निवडणुकीत राज्यात ७२३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

उत्तराखंडमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेससारख्या प्रमुख राजकीय पक्षांनी पुन्हा सामान्य कार्यकर्त्यांऐवजी कुटुंबातील लोकांना प्राधान्य दिले आहे. राज्यातील एकूण विधानसभा मतदारसंघांपैकी २० टक्क्यांहून अधिक मतदारसंघांमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नेत्यांच्या निकटवर्तीयांवरच विश्वास व्यक्त केला आहे. राज्यातील ७० विधानसभा जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत डझनभराहून अधिक उमेदवार आई-वडील, सासरे, भाऊ किंवा पतीच्या नावाचा आधार घेत मतदारांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

BJP
भाजपची मोठी खेळी; अखिलेश यांच्याविरोधात थेट केंद्रीय मंत्र्यालाच तिकीट

भाजपने उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित केलेले नाही. मात्र, राज्यातील निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जात आहेत. दुसरीकडे काँग्रेसमध्येही अशीच स्थिती आहे. पक्षाने माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते हरीश रावत यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उमेदवारी दिली नसली तरी पक्ष राज्यात रावत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बंडखोर नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. प्रत्यक्षात राज्यातील अनेक जागांवर भाजपला बंडखोरांचा सामना करावा लागत असून त्यामुळे पक्षाचे गणित बिघडले आहे. पक्षाकडून बंडखोर उमेदवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

राज्यातील ११ विधानसभा जागांवर पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. १५ कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणुकीत राज्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे.

BJP
पलकने तो फोन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भय्यू महाराजांनी केली होती आत्महत्या

आम आदमी पार्टीही भाजप आणि काँग्रेसला तगडी टक्कर देण्याच्या तयारीमध्ये आहे. यूपीसोबतच उत्तराखंडमध्येही पक्ष विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष श्रीनिवास गोयल म्हणाले की, उत्तराखंडमध्ये आप सरकार सत्तेवर आल्यास दिल्लीचे विकास मॉडेल येथे लागू केले जाईल. ते म्हणाले की, जनता भाजप आणि काँग्रेसपासून मुक्त होण्यासाठी तिसरा पर्याय शोधत आहे. या निवडणुकीत 'आप' पर्याय म्हणून रिंगणात उतरली असून जनता विकासाच्या नावावर मतदान करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com