Karnataka Congress : काँग्रेसला लोकसभेआधी मोठा धक्का?; माजी मुख्यमंत्र्यानंतर माजी उपमुख्यमंत्रीही भाजपत जाणार?

Jagdish Shettar Join BJP : भाजपने शेट्टर व सवदी या दोघांनाही उमेदवारी नाकारली होती, त्याचा तोटा भाजपला झाला होता.
 Jagdish Shettar-Laxman Savadi
Jagdish Shettar-Laxman SavadiSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज पुन्हा जय श्रीराम म्हणत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी काँग्रेसमध्ये आलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदीही नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने त्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता, तो पाळला नाही, अशी सवदी यांची भावना असून ते काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा आहे. तेही भाजपमध्ये परतणार अशी चर्चा सुरू आहे. शेट्टर यांच्यापाठोपाठ सवदी यांनीही पक्ष सोडला तर लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (After Jagdish Shettar, Laxman Savadi will also leave the Congress party?)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसने दोघांनाही तिकिट दिले होते. विधानसभेला सवदी जिंकले; मात्र शेट्टर यांचा मोठ्या मताधिक्क्यांनी पराभव झाला. त्यानंतरही काँग्रेसने शेट्टर यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आज प्रत्यक्षात उतरली. माजी उपमुख्यमंत्री शेट्टर यांनी आज भाजपत पुन्हा प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Jagdish Shettar-Laxman Savadi
Mahavikas Aghadi Meeting : निमंत्रणानंतरही ‘वंचित’ची महाआघाडीच्या बैठकीस दांडी; आंबेडकरांच्या मनात तरी काय?

कॉंग्रेसमध्ये सवदी आमदार असले तरी समाधानी नाहीत. कॉंग्रेस सरकारमध्ये माजी उपमुख्यमंत्री असलेल्या सवदींना स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. पण, शेट्टर यांच्या प्रमाणे ते काँग्रेस सोडणार का, याबाबत उत्सुकता आहे. भाजपमध्ये परतण्याचा निर्णय सवदींनी घेतला तर लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसला मोठा फटका बसू शकतो.

शेट्टर आणि सवदी हे दोन्ही नेते लिंगायत समाजातील असून त्यांच्यामुळे लिंगायत समाजाच्या मतांची विभागणी विधानसभा निवडणुकीत झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. भाजपने शेट्टर व सवदी या दोघांनाही उमेदवारी नाकारली होती, त्याचा तोटा भाजपला झाला होता. हे दोन्ही नेते पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. या दोघांची नाराजी काँग्रेसच्या फायद्याची ठरली होती.

 Jagdish Shettar-Laxman Savadi
Balasaheb Thorat : सलग आठ निवडणुका जिंकणारे नेते : बाळासाहेब थोरात

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दोघांनाही काँग्रेस उमेदवारी दिली. मात्र, शेट्टर यांचा पराभव झाला. मात्र शेट्टर यांना तातडीने विधान परिषदेवर नेमले. मात्र, सवदी यांना मंत्रिपदाची अपेक्षा हेाती. मात्र, त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे सवदी व त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

 Jagdish Shettar-Laxman Savadi
Abhijeet Patil In Trouble : पवारांच्या गाडीचे स्टेअरिंग हाती घेणारे अभिजित पाटील अडचणीत का आले? पाहा कारणे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com