केेंद्रीय मंत्रिपद अन् खासदारकीवर पाणी सोडल्यानंतर अखेर मिळवली आमदारकी!

केेंद्रीय मंत्रिपद आणि खासदारकीवर पाणी सोडल्यानंतर आता बाबुल सुप्रियोंना आमदारकीची लॉटरी लागली आहे.
Babul Supriyo and Narendra Modi
Babul Supriyo and Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

कोलकता : माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी मागील वर्षी भाजपला (BJP) धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना डच्चू देण्यात आल्यानं ते नाराज होते. केंद्रीय मंत्रिपद गमावल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या खासदारकीचाही राजीनामा दिला होता. आता मात्र, त्यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून निर्णायक आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे.

सुप्रियो यांना 18 व्या फेरीअखेर 18 हजार मतांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार आहे. भाजप तिसऱ्या स्थानी तर काँग्रेसच्या चौथ्या स्थानी आहे. अजून फक्त एक फेरी बाकी असून, सुप्रियो यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. केंद्रीय मंत्रिपद, खासदारकी आणि आता आमदारकी असा उलटा प्रवास सुप्रियो यांच्या निमित्ताने बंगालच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

Babul Supriyo and Narendra Modi
शत्रुघ्न सिन्हांची विक्रमी घोडदौड! भाजपच्या उमेदवारावर पावणेदोन लाख मतांची आघाडी

बंगालमधील एक लोकसभा व एका विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा आज निकाल लागत आहे. गायक व माजी खासदार बाबूल सुप्रियो यांच्या राजीनाम्यामुळे असनसोल मतदारसंघाची निवडणूक होत आहे. सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. ते 2014 व 2019 अशा दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. आता त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं. बालीगंज विधानसभा मतदारसंघातून ते तृणमूलकडून मैदानात उतरले आहेत.

Babul Supriyo and Narendra Modi
उत्तरमध्ये जाधवांची विजयाकडे वाटचाल! जयश्रीताईंनी विजयाचं श्रेय दिलं तीन नेत्यांना...

सुप्रियो यांनी मागील वर्षी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते पाचवे नेते ठरले होते. त्यांच्या आधी 4 भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सुप्रियो यांच्याकडे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर दोनच महिन्यांत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करुन भाजपला धक्का दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com