Rohith Vemula case : 'रोहित वेमुला दलित नव्हता, जात प्रमाणपत्र बोगस'; पोलिस अहवालात आरोपींना क्लीनचिट

Lok Sabha Election 2024 : "रोहित वेमुलांच्या आत्महत्येसाठी या संशयेच्या भोवऱ्यात असणाऱ्या सर्व आरोपींना क्लीनचिट देण्यात आली आहे..."
Rohith Vemula case
Rohith Vemula caseSarkarnama

Telangana News : तेलंगणा पोलिसांनी शुक्रवारी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. या अहवालात सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, विधान परिषद सदस्य एन रामचंदर राव, कुलगुरू अप्पा राव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह सर्व आरोपींना क्लीन चिट देण्यात आली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे रोहितला मानसिक तणाव असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे या अहवालात म्हटले आहे. राजकीय व्यस्ततेमुळे रोहितचं शैक्षणिक स्तरावर खराब कामगिरी होती. धक्कादायक बाब म्हणजे रोहितच्या आईने त्याच्यासाठी अनुसूचित जातीचे (SC) बनावट प्रमाणपत्र बनवले होते, असाही उल्लेख या अहवालात करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Rohith Vemula case
Prakash Ambedkar On BJP : 'चारशे पार'वरुन आता दोनशेवरच! स्थानिक पक्षांनीच भाजपची हवा काढली; आंबेडकरांचा टोला

पोलिस (Police) अहवालात म्हटले आहे की, “मृत व्यक्तिचा पार्श्वभूमी पाहिली तर असे दिसून येते की, तो त्याच्या अभ्यासापेक्षा कॅम्पसमधील विद्यार्थी राजकीय घडामोडींमध्ये अधिक व्यस्त होता. दोन वर्षाच्या कालावधीत तो करत असलेला पीएचडी त्याने अपूर्णच ठेवून, दुसरी पीएचडी करु लागला. शैक्षणिक गोष्टींशिवाय इतर उपक्रमात लक्ष देत असल्याने शिक्षणात फारशी प्रगती केली नाही. रोहितला आपल्या आईने बनावट जात प्रमाणपत्र बनवल्याचे त्याच्या लक्षात आले. ही माहिती बाहेर आल्यास आपली बदनामी होऊ शकते, अशी भीती त्याला वाटत होती, याच कारणामुळे त्याने आत्महत्या केली.

काय आहे प्रकरण ?

तेलंगणात 13 मे रोजी लोकसभा (LOk Sabha) निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदान (Voting) होण्याच्या अवघ्या 10 दिवस आधी हा अहवाल आला आहे. 17 जानेवारी 2016 रोजी रोहित वेमुला (26) याने हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली.

Rohith Vemula case
Shinde Will Join BJP? : सुशीलकुमार शिंदे भाजपत जाणार?; नाना पटोलेंनी दिले हे उत्तर...

2016 मध्ये वेमुला आणि इतर चार दलित विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई केली होती. या घटनेने राष्ट्रीय वादाला तोंड फुटले आणि अनेकांनी विद्यापीठ प्रशासनाकडून जातीय भेदभाव आणि छळ केल्याचा आरोप केला. 17 जानेवारी 2016 रोजी रोहित वेमुलाने वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूने देशभरात निषेध आणि संतापाची लाट उसळली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com