Satara Political News : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात झालेल्या दोन टप्प्यांमधील मतदानात भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही राष्ट्रीय पक्ष जिंकण्याचा दावा करत नाहीत. त्यांचा संभ्रम वाढवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे. भारतीय जनता पक्षाचे ‘अबकी बार चारशे पार’ हे धोरण पूर्णपणे उध्वस्त होताना दिसत आहे. ते चारशेवरून तीनशे आणि आता दोनशेवर आल्याचे वास्तव वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मांडून स्थानिक पक्षांनीच भाजपची हवा काढल्याचे सर्व्हेवरुन दिसत असल्याची टीका त्यांनी केली.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रचारसभेसाठी डॉ. आंबेडकर Prakash Ambedkar आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात झालेल्या दोन टप्प्यांमधील मतदानात भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही राष्ट्रीय पक्ष जिंकण्याचा दावा करत नाहीत. भाजपचे ‘अबकी बार चारशे पार’ हे धोरण पूर्णपणे उध्वस्त होताना दिसत आहे. ते चारशेवरून तीनशे आणि आता दोनशेवर आले आहेत. स्थानिक पक्षांनीच भाजपची हवा काढल्याचे सर्व्हेवरून दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
चंद्रहारने घेतला पायावर दगड मारून
सांगलीतून पैलवान चंद्रहार पाटील Chandrahar Patil यांच्या उमेदवारीला आपण पाठिंबा दिला होता. यावर आंबेडकर म्हणाले,चंद्रहार पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा तुम्ही अपक्ष लढा, सर्व आखाड्यांचे संघटन करा, तर मी तुमच्या प्रचाराला येईन, असे आश्वासन त्यांना दिले होते. परंतु, ते अपक्ष लढले नाहीत. ज्या सांगली जिल्ह्यात ज्यांची काहीच ताकद नाही, अशा शिवसेनेबरोबर जाऊन त्यांनी आपल्या पायावर दगड मारून घेतला आहे, अशी टीका केली.
मुख्यमंत्र्यांच्या मुलासमोर ठाकरेंचा उमेदवार कमकुवत
काँग्रेसचे तुल्यबळ उमेदवार विशाल पाटील Vishal Patil यांना उमेदवारी डावलून भाजप व काँग्रेसचा इथेही छुपा अजेंडा असू शकतो का? यावर ते म्हणाले, त्याची शक्यता नाकरता येत नाही. कारण ‘कल्याण’मध्ये उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार हा खूप कमकुवत आहे.तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा सामना करू शकत नाही. यावरून सर्वकाही स्पष्ट होते,असेही स्पष्टीकरण डॉ.आंबेडकर यांनी दिले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.